वरकुटे- मलवडी (प्रतिनिधी)
तारळी योजनचेे पाणी तुटका कडा तलावात आल्याने हजारो एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. अनिल देसाई यांच्या अथक प्रयत्नामुळे व चिकाटीमुळे हे शक्य झाले आहे असे प्रतिपादन आमदार महादेव जानकर यांनी केले.
वरकुटे मलवडी येथे तारळी पाणी योजनेच्या पाण्याचे जलपुजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल देसाई, राष्ट्रवादीचे नेते डॉ. संदीप पोळ, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, दत्तात्रय सोनवणे, रासपचे माण तालुका अध्यक्ष दादासाहेब दोरगे, सरपंच बाळासाहेब जगताप, खंडेराव जगताप, भारत अनुसे, बापूराव बनगर, सचिन होनमाने, सुरेश बनगर, सतीश जगताप, कुंडलिक यादव, रमेश यादव, जालिंदर खरात, प्रल्हाद अनुसे , कमीर इनामदार, धनाजी शिंदे, दिलीप वाघमोडे, सागर बनगर, दादासाहेब शिंदे, रफिक मुलाणी, पिंटू जगदाळे, उदय जगदाळे, किरण जगदाळे, बाबाराजे हुलगे, रामचंद्र झिमल, डाॅ. नानासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार महादेव जानकर म्हणाले या योजनेचा सर्व्हे मी मंत्री असताना करुन घेतला आहे. काम करणाऱ्या माणसाच्या मागे खंबीरपणे उभे रहा. सरकार कोणाचंही असो कायमस्वरुपी पाण्यासाठीचा आपला संघर्ष थांबणार नाही. आपलं पाणी आता कोणी थांबवू शकत नाही. मात्र आम्हाला फक्त पिण्यासाठी नव्हे तर शेतीसाठी पाणी पाहिजे. पाणी येवून इथला शेतकरी सधन झाला पाहिजे ही माझी भूमिका असून त्यासाठी संघर्ष करण्याची माझी तयारी आहे.
अनिल देसाई म्हणाले, आज या परिसरासाठी अतिशय भाग्याचा दिवस असून यापुढे आपल्याला कधीही पाण्यासाठी टँकरची गरज लागणार नाही. टेंभू व तारळीच्या पाण्यामुळे अमूलाग्र बदल होवू लागला असून ऊसाच्या क्षेत्रात कमालीची वाढ होवू लागली आहे. वरकुटे-मलवडी, बनगरवाडी,महाबळेश्वरवाडी,कुरणेवाडी गावांचा तारळी योजनेत कायमस्वरुपी समावेश व्हावा व शेनवडी गाव आणि पडळकर खडक तलावमध्ये टेंभू योजनेचे पाणी सोडावे या मागणीसाठी आमचा लढा यापुढेही सुरु राहणार आहे. कुकुडवाड गटात सर्वत्र पाणी खेळलं आहेच. यासोबत गावागावात विकासकामे करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
डॉ.संदीप पोळ म्हणाले, आमदार महादेव जानकर यांनी सामान्य माणसांच्या हितासाठी अन माण तालुक्याच्या विकासासाठी फक्त पाणी चळवळीचेच नव्हे तर माणचे नेतृत्व करावे.
या कार्यक्रमास परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
तारळी योजनेचे खरे वाटाडे….
“२०१३ साली अनेक अडथळ्यांवर मात करत तुटका कडा तलाव बांधण्यात आम्हाला यश आले. त्यावेळी या तलावाचा तारळी योजनेचे पाणी साठविण्यासाठी उपयोग होईल असा विचारही केला नव्हता. पण सामाजिक कार्यकर्ते भारत अनुसे व बापूराव बनगर यांनी तारळी योजनेचे पाणी या तलावात कसे आणता येईल याची सर्वप्रथम वाट दाखवली. त्यामुळे तारळी योजनेचे खरे वाटाडे हे दोघे आहेत.” अनिल देसाई.