पडळ गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही भारतीय जनता पार्टीचे जिल्हाअध्यक्ष आमदार जयकुमारजी गोरे यांची ग्वाही
पडळ ता.खटाव या गावात आज पर्यंत एकही वैयक्तिक पाणी पुरवठा योजना झाली नाही जलजीवन मिशन अंतर्गत पडळ गावासाठी १ कोटी ४३ लाख रुपये मंजूर झाले त्याचे उद्घाटन करताना आमदार गोरे बोलत होते
त्यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण साहेब, भारतीय जनता पार्टी माण-खटाव भाजपा संघटक प्रमुख श्री .सिद्धार्थजी गुंडगे,विशाल बागल ,संबंधित सरकारी अधिकारी ,ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ४३ लाख रुपये खर्च करून प्रत्येक घराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे त्या कामाचे उद्घाटन सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमदार जयकुमार जी गोरे व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या संबोधनात श्री. गोरे म्हणाले की, जल है तो जीवन है. पडळ गावात भविष्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून घराघरात शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार आहे. विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी हर घर जल हे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न पडळ गावात मूर्त रूप घेत आहे.
पडळ गावात मूलभूत कामांच्या विकासाला चालना देण्यात येईल.
गेले काही वर्ष महाराष्ट्रात आपले सरकार नसल्याने विकास थांबला होता. परंतु आता महाराष्ट्राचे देवेंद्र सरकार सामान्यांच्या आणि गोरगरीबाच्या हिताचे अनेक निर्णय घेत असल्याचे श्री. गोरे यांनी उपस्थितांना सांगितले. गावातील तरुण-तरुणींच्या पाठिशी केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण शक्तीनिशी उभे आहे असा विश्वास त्यांनी उपस्थिताना दिला. आता शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार रुपये थेट जमा होणार आहेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे ना. श्री. गोरे यांनी सांगितले. सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा यासाठी गावातीलच सुशिक्षित तरुणाईने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून सुटलेल्या शेतकऱ्यांची नावेही लवकरच समाविष्ट करण्यात येतील. सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात शेतकऱ्यांना पिकविमा मिळणार आहे. त्याचाही लाभ सर्वांनी घेणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.शेतकऱ्यांचे कोणत्याही कारणाने निधन झाले तरी त्याचे कुटुंब उघड्यावर येते. त्यामुळे आपण अर्थमंत्री असताना शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश अशा कारणांसाठी मिळणाऱ्या मदतीत वाढ केली. हे करून आपण शेतकऱ्यांप्रती असलेले आपले कर्तव्य निभावले असे
श्री .गोरे म्हणाले. २०१८ नंतर शेतकरी कुटुंबातील सदस्यांना अशा विम्याचा लाभ मिळत आहे. आता त्याही पुढे पाऊल टाकत सरकारने निर्णय घेतलाय की अशा शेतकरी कुटुंबांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असेही गोरे यांनी अभिमानाने नमूद केले.
लोकप्रतिनिधी म्हणून कल्याणाचा संकल्प आमदार, लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे लोकहिताचे व त्यांच्या हक्काची कामे करणे ते त्यांचे कर्तव्यच आहेत. आपण आमदार म्हणून लोककल्याणाच्या संकल्पच केला. समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असे भावनिक उद्गारही आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी यावेळी काढले.