मोफत नगर वाचनालयामध्ये राजर्षी शाहू महाराजांना स्मृति दिनानिमित्त अभिवादन
म्हसवड:
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना 101 व्या स्मृती दिनानिमित्त येथील मोफत नगर वाचनालयात अभिवादन करण्यात आले.ल दीनदुबळ्यांना आईच्या अंतकरणाने पाहणारा राजा म्हणजे लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज .
राज सत्ताही ऐशारामात जगण्यासाठीनसून राज सत्तेचा वापर जनकल्याणासाठी करावयाचा असतो हे ज्यांच्या राज्यकारभाराचे सूत्र होते.
अशा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृतीला मोफत नगर वाचनालयाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष नितीन भाई दोशी व वाचक यांनी त्यांच्या विचार व कार्यास अभिवादन केले.
याबरोबरच मोफत नगर वाचनालय व अहिंसा पतसंस्थेमध्ये आज सकाळी १० वा. १०० सेकंद स्तब्ध उभा राहून अभिवादन करण्यात आले.