दहिवडी कॉलेजला नॅक पूनर्मूल्यांकनात अ++ श्रेणी
दहिवडी : ता.१३
दहिवडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेजला बेंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्विकृती परिषद (नॅक) यांच्याकडून ४ थ्या पूनर्मूल्यांकनात अ++ ही सर्वोच्च श्रेणी प्राप्त झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी दिली.
दि.१९ व २० मे २०२३ रोजी बेंगलोर येथील रेवा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. धनंमजय मदिराजू यांच्या अध्यक्षते खालील लखनौ येथील इंटिग्रल विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. महम्मद सिद्दकी व केरळ येथील सेंट जोसेफ कॉलेज फॉर वुमेन्स या कॉलेजच्या माजी प्राचार्या डॉ. शिना जॉर्ज यांचा समावेश असलेल्या नॅक पीअर टीमने महाविद्यालयास भेट देऊन मूल्यांकन केले होते.
अभ्यासक्रम, अध्ययन- अध्यापन, मुल्यमापन, संशोधन, नवोपक्रम व समाजाभिमुखता, पायाभूत सुविधा व अध्ययन सामुग्री, विद्यार्थ्यांसाठी सहाय्यभूत सेवा व प्रगती, प्रशासन, नेतृत्व आणि व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्ये व सर्वोत्तम उपक्रम या प्रमुख सात निकषांच्या आधारे मुल्यांकन करण्यात आले. संख्यात्मक व गुणात्मक अशा दोन्ही पातळीवरील मूल्यांकनात महाविद्यालयाने सर्वोत्कृष्ट 3.60 हा सीजीपीए स्कोर प्राप्त केला.
यावेळी प्रतिक्रिया देताना प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे म्हणाले, “नॅकच्या सर्वच निकषांमध्ये महाविद्यालयाने उत्कृष्ट गुणांकन प्राप्त केले, नॅकची अ++ श्रेणी प्राप्त करण्यासाठी संस्था पदाधिकार्यांचे मार्गदर्शन, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचे परिश्रम व पालक, हितचिंतक यांचे सहकार्य लाभले सर्वांचे मनःपूर्वक आभार!”
कॉलेजला अ++ श्रेणी प्राप्त झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख, जनरल बॉडी सदस्य सौ. निलीमा पोळ, डॉ. प्रदीपकुमार शिंदे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नंदकुमार खोत यांनी प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे, उपप्राचार्य डॉ. ए. जे. बरकडे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वक डॉ. ए. एन. दडस, कार्यालय अधिक्षक केशव औटे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांचे अभिनंदन केले.