रिच आधार कंपनीच्या चेअरमन वर पोलिसात गुन्हा दाखल.
18 लाख 40 हजार 500 रुपयाची फसवणूक
आटपाडी प्रतिनिधी
सांगली येथील रिच आधार कंपनीचे चेअरमन सतीश बंडगर यांच्यावर म्हसवड- पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून 18 लाख 40 हजार 500 रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार म्हसवड पोलीस स्टेशन येथे वरकुटे मलवडी येथील महादेव काटकर यांनी केली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
एका वर्षात दुप्पट पैसे देतो असे सांगून अनेकांची लुबाडणूक करणाऱ्या रीच आधार कंपनीच्या चेअरमन वर गुन्हा दाखल झाला असून म्हसवड पोलीस स्टेशन गुन्हेगाराचा शोध घेत आहे अशी माहिती मसवड पोलीस स्टेशनचे एपीआय राजकुमार भुजबळ व पोलीस उपनिरीक्षक भंडारे यांनी दिलेली आहे.
गुन्हयाची थोडक्यात हकिकत अशी,
:-दिनांक जानेवारी 2021 पासुन ते नोव्हेंबर 2022 पर्यंत रिचआधार मल्टीट्रेडर्स अँन्ड डेव्हलपर्स एल.एल.पी., सांगली चे चेअरमन सतिश काका बंडगर, रा.निर्मीती रेसिडेन्सी.फ्लॅट नं G-1,संजय नगर पोलिस स्टेशन मागे चिंतामणी नगर सांगली याने वेळोवेळी माझी रुपये 6,50,000/- रक्कमेची तसेच 1) हणमंत सोपान खरात रा.वरकुटे मलवडी ता.माण जि.सातारा यांची 1,60,000/- रुपये , 2) पोपट बयाजी मिसाळ, रा.वरकुटे मलवडी ता.माण जि.सातारा यांची 2,20,000/- रुपये , 3) शितल आप्पासाहेब पुकळे,रा.पुकळेवाडी ता. माण जि. सातारा यांची 4,00,000/- रुपये, व 4) राजकुमार महालिंग डोंबे, रा.म्हसवड ता.माण ,जि.सातारा यांची 4,10,500/- रुपये अशी नमुद 4 लोकांची मिळुन 18,40,500/- रुपये रक्कमेची परतावा निश्चतपणे परत देण्याचे आश्वासन देवुन विश्वास संपादन करुन आर्थिक फसवणुक केली आहे.
म्हणुन माझी रिचआधार मल्टीट्रेडर्स अँन्ड डेव्हलपर्स एल.एल.पी., सांगली चे चेअरमन सतिश काका बंडगर, रा.निर्मीती रेसिडेन्सी.फ्लॅट नं G-1,संजय नगर पोलिस स्टेशन मागे चिंतामणी नगर सांगली व डायरेक्टर व फाउंडर यांचे विरुध्द तक्रार आहे.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे करीत आहेत.