सदिच्छा फौंडेशनची समाजसेवेकडे यशस्वी वाटचालःसंतोष मोरे
धीरेन कुमार भोसले दहिवडी:
सदिच्छा हाॅस्पिटल व फौंडेशन ही रजिस्टर संस्था वडूजमध्ये सामाजिक व गरजू लोकांना मदत करताना दिसून येते.याचाच प्रत्यय शनिवारी वडूजकरांना आला,ते झालं असं की,डाॅ.संतोष मोरे यांनी आपल्या फौंडेशनच्या सर्व सदस्यांना पाठीमागे प्रतिपश्चंद व पुढील बाजुस केदारनाथ लिहीलेले छापील लिखान असलेले टी-शर्ट वाटप केले.
सदिच्छा हाॅस्पिटल व फौंडेशनचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष डाॅ.मोरे यांनी २०१९ पासून सदिच्छा सोशल फौंडेशनच्या माध्यमातून महिन्यातून दोन वेळा नेत्र तपासणी शिबीर,आजपर्यत ७५० हून अधिक रुग्णांना शस्त्रक्रिया केल्या आहेत.त्यापैंकी २०० रुग्णांना म.जोतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया केल्या आहेत.२०२२ साली सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली.कोरोना काळात डाॅ.मोरे यांनी स्वतः धोका पत्करून रुग्णसेवा करत २००० रुग्णांवर औषधोपचार केले.यामाध्यमातून अॅम्बुलन्स व टोईंग व्हॅनची सुविधा अत्यल्प खर्चात उपलब्ध आहे.सदिच्छा हाॅस्पिटलमध्ये सुमारे २००-२५० रुग्णांवर नाममात्र खर्चात उपचार केले जातात.
यावेळी बोलताना डाॅ.मोरे म्हणाले,समाजातील गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना आरोग्यविषयक विवीध सोयीसुविधा अत्यल्प खर्चात उपलब्ध करण्याचा मानस आहे.तसेच हाॅस्पिटल व फौंडेशनच्या माध्यमातून जनसेवा उपलब्ध व्हावी,हीच सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी मुद्रांक विक्रेते महेश शिंदे,प्रसाद जगदाळे,दिपक मोरे,हणमंत माने,तेजस शहा,महेश मोरे,विशाल फडतरे,नितीन सजगणे,आकाश मोरे,राहुल नलवडे व इतर उपस्थित होते.