भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्त्वपूर्ण दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवनियुक्त कार्यकारणी जाहीर करण्यात आली.केंद्रीय नेतृत्व,राज्यातील नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारणी यांच्याकडून सातारा जिल्हाध्यक्षपदी धैर्यशिल कदम यांची निवड करण्यात आली.
राज्यातील बदलते राजकीय समीकरण तसेच भाजपाचे संघटन,मोर्चेबांधणी यादृष्टीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील बहुसंख्य जिल्हाध्यक्षांच्या नवनियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला.यात कराड उत्तरचे युवा नेते व वर्धन अॅग्रोचे चेअरमन श्री.कदम यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली.यामुळे कराडसह जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते,पदाधिकारी चार्ज होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
तसेच ते माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे प्रमुख विरोधक आहेत.त्यामुळे त्यांना शह देऊन कराड उत्तर भाजपामय करण्यासाठी हायकमांडने त्यांना संधी दिली आहे.वर्धन अॅग्रोच्या माध्यमातून लोकहित व जनसंपर्क याचा श्री.कदम यांच्यासह भाजपाला फायदा होऊ शकतो,यात शंका नाही.
मावळते जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे यांचे ते विश्वासू मानले जातात.यामुळे आ.गोरेंच्या मार्गदर्शनाचा विद्यमान जिल्हाध्यक्षांना फायदा होणार यात शंका नाही.परंतू अचानक बदललेल्या जिल्हाध्यक्षांमुळे आ.गोरेंना मंत्रीपदाची संधी मिळू शकते का? अशी चर्चा माण खटावसह जिल्ह्यात रंगू लागली आहे.
या नियुक्तीबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खा.उदयनराजे भोसले,आ.जयकुमार गोरे,खा.रणजितसिंह ना.निंबाळकर,आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले,अतुल भोसले,मनोज घोरपडे यांच्यासह विवीध मान्यवरांनी अभिनंदन केले.