तहसीलदार बाई मानेंची फसवणूक, सालगड्यांवर गुन्हा दाखल
म्हसवड …प्रतिनिधी
माणच्या तत्कालीन,तर आटपाडी येथे कार्यरत असलेल्या तहसीलदार बाई माने यांची ५६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन सालगड्यांवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
माने यांच्या गट नं. ९८८ मध्ये कामाला असलेल्या दोन सालगड्यांकडे कामापोटी १ लाख ५६ हजार रुपये येणे बाकी होती. त्यातील कामाचे दिवस वगळता ५६ हजारांची बाकी ठेवून करारपत्रातील अटींचे उल्लंघन करून ते दोघेजण निघून गेल्याने अजय गजानन शेळके व शुभम गजानन शेळके (दोघे रा. पालोती, पो. वालखेड, ता. बाभुळगाव, जि. यवतमाळ) या दोघांविरोधात म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बाई सर्जेराव माने (वय ४६, मूळ रा. म्हसवड, सध्या रा. आटपाडी) यांनी फिर्याद दिली.