माण ची शान काजल गोसावी गाजवतेय लावणीचा महामंच
(संघर्ष व जिद्दीने पार केला स्वप्नपूर्ती चा प्रवास)
सातारा जिल्ह्यातील दहिवडी (ता. माण) येथील एक सामान्य कुटुंबातील कन्या कु . काजल शेखर गोसावी ही आपल्या मेहनत व जिद्दीच्या जीवावर आज लावणीच्या महामंचावर पोहचली आहे.
सध्या कलर्स मराठी वाहिनी वर सुरू असणारा लोकप्रिय डान्स रियालिटी शो ‘ढोलकीच्या तालावर’ यामध्ये काजल आपल्या नृत्याने हा लावणीचा महामंच गाजवत आहे.
काजल ही एक सामान्य कुटुंबातील मुलगी असून, तिचे वडील शेखर गोसावी हे बांधकाम क्षेत्रात मजुरी करतात , तर काजल च्या आई सौ. विजया शेखर गोसावी या गृहिणी असून त्या शेळी पालन ही करतात . मात्र या दोघांनी ही खूप कष्ट करून आपला संसाराचा गाडा पुढे नेत आपल्या मुलीला ही काही कमी पडू दिले नाही . आपल्या मनमिळवू स्वभावाने दोघेही परिसरात परिचित आहेत . तात्या व माई अशी त्यांची ओळख .
काजलच्या वडिलांना पहिल्यापासूनच लावणीची आवड , हीच आवड त्यांनी काजल मध्ये ही उतरवली
काजल ही लहानपणापासूच जिद्दी होती , साधारण 10 ते 11 व्या वर्षी च तिने एका डान्स स्पर्धेत भाग घेऊन आपल्या टॅलेंटे ची झलक दाखवली होती , यानंतर तिच्या मनात ही डान्स विषयी ओढ निर्माण झाली . यानंतर तिने मागे वळून पहिलेच नाही , तिने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला व स्पर्धा जिंकली ही , परंतु स्वाभिमानी असणारी काजल , आपला सर्व खर्च ही यामधून करून आपल्या वडिलांना हातभार लावायची .सुरुवातीला फक्त आवड व ओढ असणारी गोष्ट आता वडिलांचे स्वप्न म्हणून तिच्या नसानसात भिनली. व हेच स्वप्न पूर्ण करणे हे काजल जे ध्येय बनले.
मात्र यासाठी तिला तिच्या वडिलांनी मोलाची साथ दिली . बाप- लेकीची ही जोडी आपल्या स्वप्नांना सोबत घेऊन प्रवास करताना कुठेही स्पर्धा असो , तिचे वडील तिला आपल्या मोटारसायकल वर घेऊन तिथे पोहचत असे. दिवस – रात्र न म्हणता मग तो कितीही मैलांचा प्रवास असला तरी चालेल. शिवाय काजलच्या आई चा ही तिला एक मैत्रीण म्हणून प्रोत्साहन द्यायच्या. यासाठी दोघांनीही कोणतीच कसर सोडली नाही.
काजल ही उत्तम अभिनय ही करते , आता पर्यंत बऱ्याच लघुपट व अल्बम मध्ये ही काम केले आहे . माण मधील च हर्षा फिल्म्स प्रॉडक्शन च्या शॉर्ट फिल्म व ‘ सफर माणदेशी’ या ऐतिहासिक डोकॉमेंट्री मध्ये काजल प्रमुख सूत्रसंचालन मध्ये दिसली.
आज काजलने ढोलकीच्या तलवार थिरकून आपल्या अदाकारीने सर्व प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ पाडली आहे . तर शोच्या परिक्षकांची ही मनं जिंकून ती चांगली दाद मिळवत आहे. सोबतच आपल्या मुलीला टीव्ही वर पाहण्याचे स्वप्न ही काजल ने पूर्ण केले आहे.
आईची साथ , वडिलांचे स्वप्न , व काजल ची जिद्द हेच आज तिला या लावणीच्या महामंच्यावर घेऊन आले आहे. या माण च्या कन्येला पुढील वाटचालीस शुभेच्छा
प्रतिनिधी
अमर शिंदे , पिंगळी बु!!