दहिवडी ता.माण येथील मुळीकवस्ती नजीक जिहे-कटापूर योजनेचे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पोकलॅन ब्रेकर चोरी प्रकरणी चौघांना अवघ्या चार तासात जेरबंद करत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला पोकलॅन ब्रेकर,गुन्हा करण्यासाठी वापरलेला जेसीबी,ट्रॅक्टर,ट्रॅालीसह चारचाकी गाडी असे एकुण ७६’३३’४०० रु.किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केल्याने दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दहिवडी पोलीस ठाण्याच्या स्थापनेपासून आतापर्यंतची चोरीच्या गुन्ह्यातील रिकवरीबाबतची सर्वात मोठी कारवाई असल्याने या चोरीची चर्चा सातारा जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात झाली होती.
याची दखल घेऊन सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधिक्षक बापु बांगर यांनी सपोनि अक्षय सोनवणे यांना विशेष पुरस्कारासह २५ हजार रुपये रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बापू खांडेकर,धनंजय घाटगे,स्वप्निल म्हामणे,रामचंद्र गाढवे,अजिनाथ नरबट,सुहास गाडे ,सागर लोखंडे,निलेश कुदळे उपस्थित होते.