राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेगळी भूमिका घेऊन युवक,विद्यार्थ्यांची फळी मजबूत करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मनविसेच्या कार्यकर्त्यांवर संघटनात्मक पदांची जबाबदारी देत संघटनात्मक बांधणीस सुरूवात केली आहे.
येत्या लोकसभा,विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या दृष्टीने केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या म्हणजे महाराष्ट्रातील सर्वांत प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना म्हणून मनविसे कडे पाहिले जाते.विद्यार्थ्यांवर अन्याय होत होत असेल,सामाजिक काम,युवक व विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीत ही संघटना हिरिरीने सहभागी होत असते.ही एकमेव संघटना आहे जिथे महिलांना स्वतंत्र सांस्कृतिक आणि क्रीडा संबंधी विशेष शाखा आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्याकडून राज्यातील बदलते राजकीय समीकरण व संघटन मोर्चेबांधणी या दृष्टीने युवकांना संधी दिली जात आहे.यातच सातारा जिल्हा मनविसेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.जिल्हा समन्वयकपदी सुरज पवार,जिल्हा सचिव रणजित पडमळकर,उपजिल्हाध्यक्षपदी स्वप्निल कोळी यांच्यासह माण,खटाव,फलटणच्या तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे करण्यात आल्या.
या निवडीबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे,मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे,जिल्हाध्यक्ष धैर्यशिल पाटील,मनविसे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे यांच्यासह विवीध मान्यवरांनी अभिनंदन केले.