शेतकऱ्याच्या मुलीची चीनच्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
: संस्कृती मोरेची चीनच्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
धीरेन कुमार भोसले दहिवडी:
दहिवडी ता.माण येथील शेतकरी कुठूंबातील असणारी कु.संस्कृती विकास मोरे ही संपुर्णपणे दिव्यांग खेळाडू असून ती दिव्यांग बुद्धिबळ महिला खेळाडूंपैकी एकमेव महाराष्ट्रीयन खेळाडू आहे.
दहिवडीतील मुळ राहिवासी असलेली संस्कृती मोरे जन्मतःदिव्यांग आहे.लहानपणापासून आई,वडिलांचा पाठींबा तसेच संस्कृतीची जिद्द,चिकाटी व कष्ट याच्या जोरावर अफाट मेहनत घेत जवळपास ३ वर्षे सराव केला.सातारा,पुणे सारख्या शहरात कुठूंबासह वास्तव्य करुन सुरत,चेन्नई,नागपूर,चंदीगढ व गोवा याठिकाणी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय,राज्यस्तरीय पातळीवर बुद्धिबळ खेळ प्रकारात गवसणी घातली आहे.
माण तालुक्यासारख्या दुष्काळी व ग्रामीण भागातील संस्कृतीने सातारच्या आण्णासाहेब कल्याणी महाविद्यालय,दहिवडीच्या प.म.शिंदे कन्या विद्यालय व सध्या ११ वी उत्तीर्ण होऊन १२ वी मध्ये फर्ग्युसन कॅालेज,पुणे येथे शिकत असून शास्त्रीय संगीतावर तिची मजबूत पकड आहे.
वडील शेतकरी व आई गृहिणी असणाऱ्या संस्कृतीने समाजाची मान उंचावली आहे.ती सध्या राष्ट्रीय कनिष्ठ प्रकारात खेळत असून २२ ते २८ अॅाक्टोबरला चीनमध्ये
होणाऱ्या AICFB तर्फे दहिवडीची सुकन्या व प.म. शिंदे कन्या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी संस्कृती मोरेची आशियाई पॅरागेम साठी निवड झाली आहे.भारताचे प्रशिक्षक स्वप्निल शहा,महाराष्ट्राचे प्रशिक्षक पंकज बेंद्रे,शाबुद्दीन शेख,अमित देशपांडे यांनी संस्कृतीला मार्गदर्शन केल्याने तिने आजपर्यंत उत्तुंग यश प्राप्त केले आहे.
येत्या आशियाई गेममध्ये गोल्ड मिडल मिळवण्याचा तिचा मानस आहे.या सरावासोबतच ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यास करते व उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे.
यानिवडीबद्दल सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.