दहिवडी पोलीसांकडून रोडरोमीओंवर कारवाई !
विभागीय प्रतिनिधी __धीरेन कुमार भोसले दहिवडी:
दहिवडी ता.माण येथील दहिवडी कॅालेज,म.गांधी कॅालेज परिसरातील अल्पवयीन रोडरोमीओ व बेशिस्त वाहनचालक,विनापरवाना वाहन चालवणारे इसम,वाहने चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर एम.व्ही अॅक्ट कारवाई तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे मोटार वाहन अधिनियम प्रमाणे २४ केसेसच्या माध्यमातून २२४०० रु.दंड,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०/११७ प्रमाणे ५३ केसेस,भा.दं.वि.स कलम २८३ प्रमाणे ०३ केसेस असा रोडरोमिओ कारवाईचा तपशील असून दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील एस.टी.स्टॅंड परिसर,दहिवडी कॅालेज परिसर,फलटण चौक,बिदाल चौक येथे स.पो.नि अक्षय सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी स्पेशल ड्राईव्ह घेऊन बेशिस्त वाहन चालक,रोडरोमिओ तसेच अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईनंतर दहिवडीचे स.पो.नि. अक्षय सोनवणे यांनी दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरीकांना आवाहन व सुचना केली की,यापुढे नागरीकांनी त्यांच्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नये,मोटार वाहन अधिनियमाप्रमाणे अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास दिल्यास पालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
सदर कारवाईत स.पो.नि अक्षय सोनवणे,पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे,वाहतुक पोलिस अंमलदार सागर लोखंडे,सहदेव साबळे,अंमलदार सुहास गाडे,लखन कुचेकर,निलेश कुदळे,निलम रासकर,प्रणाली सत्रे सहभागी होते.