*संपुर्ण सातारा जिल्ह्यात बहुचर्चित माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.बाजार समितीसाठी काल दि:०७ आॅगष्ट रोजी मतदान झाले होते.आज सकाळी ०८ वा.मतमोजणीला सुरुवात झाली.
माण बाजार समितीच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनी एकहाती सत्ता राखली आहे.भाजपाचे १० सदस्य विजयी झाले आहेत.तसेच विरोधी गटाचे प्रभाकर देशमुख,अनिल देसाई,राष्ट्रीय काॅंग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस पॅनलला ०७ जागांवर समाधान मानावे लागले आहे.तर शेखर गोरे यांच्या शिवसेनेच्या पॅनलला शुन्य जागा मिळाल्या.
त्यामुळे अटीतटीच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे.त्यामुळे शिवसेनेची निराशा झाली आहे.माण तालुका बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार गोरेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती.त्यांनी एकहाती सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.माण बाजार समितीवर एकुण १८ संचालक निवडुन द्यायचे होते.यासाठी २०६५ मतदार होते.या निवडणुकीत ९८% मतदान झाले होते.*