…..ॲड . दत्तात्रय फडतरे
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
ॲड . दत्तात्रय फडतरे
पुरंदर –
मराठा समाजाने आरक्षण मागणीसाठी सुरु केलेल्या उपोषणाला तालुक्यातुन वाढता पाठींबा मिळत आहे. बोपगावात साखळी उपोषणाच्या सहाव्या दिवशी सोमवार (ता. ३०) पाठींब्यासाठी मराठा बांधवांची वज्रमुठ दिसून आली.
कोंढवा – सासवड मार्गावरील बोपगाव येथे सकल मराठा समाज आणि समस्त ग्रामस्थ यांनी मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी , ग्रामस्थांनी सहभागी झाले.सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात येण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला .
मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे . कोण म्हणते देणार नाही ,घेतल्याशिवाय राहणार नाही , एक मराठा लाख मराठा , चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष ,मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष अशा घोषणा देण्यात आल्या .आजवर लढलो , मातीसाठी आता , लढा जातीसाठी अशा आशयाचे बॅनर लावण्यात आला होता. गावातील नागरिक समाज माध्यमांवर आपला पाठिंबा दर्शवत आहेत.
यावेळी प्रकाश फडतरे , संभाजी फडतरे , सर्जेराव जगदाळे , भिकाजी फडतरे , निवृत्ती फडतरे , बबन जगदाळे , बाळासाहेब फडतरे , भालचंद्र फडतरे , हनुमंत फडतरे ,दत्ताञय फडतरे , महादेव फडतरे , शिवाजी फडतरे , बबन फडतरे , तानाजी फडतरे , तुकाराम फडतरे आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .