• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, December 16, 2025
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home पुणे

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ ! राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

माणगंगा by माणगंगा
January 19, 2024
in पुणे
0
अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ  !  राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

अभिमानास्पद ! शेतकरी कुटुबांतील नवनाथ फडतरे यांची नेट परिक्षेत जीआरएफ !

राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा चार वेळा पराक्रम

ॲड. दत्तात्रय फडतरे

पुणे पुरंदर
तालुक्यातील बोपगाव येथील नवनाथ फडतरे यांनी नेट परिक्षेत जीआरएफ प्राप्त झाली आहे.आंतराष्ट्रीय सबंध या विषयात हे यश मिळाले आहे .नुकतेच डिसेंबर मध्ये झालेल्या नेट परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत.

यापुर्वी ,गेट परीक्षा तसेच नेट इतिहास , संरक्षण आणि सामरिक शास्ञ आणि आता आंतराष्ट्रीय सबंध याविषयामधुन जीआरएफ प्राप्त झाली आहे .सध्या ते आय.आय.टी गुवाहाटी ,आसाम राज्य येथुन ” इंडीयन डिप्लोमँटीक हिस्टरी अँड इंटरनॅशनल हिस्टरी ” मध्ये पी.एच.डी करत आहेत

फडतरे यांनी पुणे साविञीबाई पुणे,विद्यापीठातुन पदवी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले असून इंडीयन इंट्यिट्युट आॅफ टॅक्नोलाॅजी अर्थात आय. आय. टी गुवाहाटी मधुन पदव्युत्तर पदवी पुर्ण केली आहे.

मराठी माध्यमांतुन शिक्षण घेऊनही कोणतीही मोठी शैक्षणिक पार्श्वभुमी नसताना नवनाथ भारतातील नामांकीत असणाऱ्या आय. आय. टी प्रवेश मिळवला होता .

नवनाथ यांचे जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवी पर्यंतचे शिक्षण, आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावात वर्गखोल्या नसल्याने गावातील मंदिरात बसुन पूर्ण केले. अकरावी -बारावीत असताना जास्त वेळ कॅालेज न करता शेतातील कामे तसेच, डोंगरावर जनावरांना चारायला नेताना तिकडे इंग्रजी पुस्तकांचे वाचन तसेच प्रवास करताना बसमधुन ये- जा करताना मोकळ्या वेळेत इंग्रजी व्याकरण आणि शब्दभंडार वाढविण्यासाठी कायम भर देत असत. याचा त्यांना फायदा होत गेला.

पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधुन शिक्षण दिल्यानंतरच, खासगी शिकवणीसाठी लाखो रुपयांची फी भरल्यानंतरच मुलं -मुली यशस्वी होतात हे चुकीचे असल्याचे सिदध करुन दाखवले आहे. आत्तापर्यंतचा शैक्षणिक आलेख कोणताही क्लास न लावता उंचावला आहे.

परिस्थिताचा बाऊ न करता कोणतीही कारणं न सांगता भरपुर मेहनत आणि ज्या क्षेञात जायचे, त्या क्षेञात स्वत:ला पुर्णपणे झोकुन दिले तर सर्वसामान्य गोरगरिब शेतकरी कुटुंबातील मुलं – मुली देखील देखील आपल्या आई- वडीलांचे नाव उंचावुन समाजात चांगले आदर्श निर्माण करु शकतात असे फडतरे यांनी सांगितले.

विविध राष्ट्रीय परिक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवुन नवनाथ आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहे. बोपगाव या छोट्याशा गावातील नवनाथ यांची गरुडक्षेप सर्वांना निश्चितच प्रेरणादायी आहे.

फडतरे यांचे वडिल निवृत्त सैनिक आहेत. बंधू , ॲड . दत्ताञय फडतरे यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली पुढे कायद्याचे शिक्षण पुर्ण केले आहे ते सध्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालय , सासवड येथे प्रॅक्टीस करत आहेत.

आईचे चे शिक्षणासाठी मिळत असलेले पाठबळ आणि प्रोत्साहन, बंधु राकेश यांचे सर्वच बाबतीत सहकार्यामुळे यश मिळाल्याची भावना नवनाथ यांनी व्यक्त केली.

Views: 589
Share

Related Posts

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार
पुणे

पुरंदरमध्ये  ईव्हीएम चोरी  प्रकरणी आधिकारीनिलंबित  ; सुनावण्या लांबणीवर पडल्याने नागरिकांची गैरसोय……ॲड . दत्तात्रय फडतरे यांची सीएमओं कडे तक्रार

February 24, 2024
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
पुणे

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

December 26, 2023
कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे

कर्जत येथून चारचाकी वाहनाची चोरी…..पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

November 11, 2023
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे
पुणे

पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

November 8, 2023
बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी
पुणे

बोपगावात मराठा समाजाची वज्रमुठ , राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी

October 30, 2023
पुणे

आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या आव्हानाला दाखविली केराची टोपली.

October 3, 2023
Next Post
झरेतील मेंढपाळाची पोरगी उज्ज्वलाचे उज्ज्वल यश…. बनली क्लास वन अधिकारी

झरेतील मेंढपाळाची पोरगी उज्ज्वलाचे उज्ज्वल यश.... बनली क्लास वन अधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • जीवनदीप विद्यामंदिर, कामथ, तालुकास्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम व जिल्हास्तरीय निवड
  • .. आणि राजभवनात आमदारांची शिरगणती झाली !!उमेश काशीकर यांचे मनोगत !!
  • खानापूर तालुका पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची फेरनिवड…..
  • नऊ वर्षीय मुलीवर 70 वर्षाच्या वयोवृध्द नराधमाने केला लैंगिक अत्याचार

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)