आमदार, नामदारकीच्या उंचीचे स्वनेतृत्व सुरज पाटील यांनी साकारावे .
सादिक खाटीक यांची अपेक्षा .
______________
आटपाडी दि . २६ ( प्रतिनिधी )
जिल्हा – राज्याच्या नेत्यांनी आमदार – नामदारकी बोलावून दिली पाहिजे, एवढे कर्तृत्वसंपन्न, लक्षवेधी नेतृत्व सुरज पाटील यांनी आपल्या स्वकर्तृत्वाच्या माध्यमातून राज्यभर पुढे आणले पाहीजे . अशा भावना कुरेश कॉन्फरन्स भारतचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी व्यक्त केल्या .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आटपाडी तालुका अध्यक्ष सुरज रावसाहेबकाका पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त राजारामबापू हायस्कुल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . त्यावेळी सादिक खाटीक बोलत होते .
प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक टी . डी . चव्हाण यांनी फेटा बांधून शाल गुच्छ आणि केक भरवत सुरज पाटील यांना शुभेच्छा दिल्या . प्रशालेतील शिक्षक विद्यार्थ्यांनीही शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले .
स्वातंत्र्यानंतरच्या पंचाहत्तरीत आटपाडी तालुक्याची सर्वच क्षेत्रात मोठी परवड झाली . प्रत्येक महत्वाच्या बाबीसाठी जीवघेणा संघर्ष केल्यानंतरच त्या मिळाल्या . मात्र आज अखेर झालेल्या विधानसभेच्या १५ निवडणूकीत फक्त दोन वेळाच आटपाडी तालुकावाशीय आमदार झाले . ही सततची राजकीय सल आटपाडी तालुक्याला त्रासदायक ठरते आहे . हे वास्तव लक्षात घेऊन कुणाची हाँ, जी !, हाँ, जी !! करत काही मागण्यापेक्षा आपल्या लक्षवेधी कार्य कर्तृत्वाची देशभर दखल घेतली जाईल इतकी उंची मोठी करण्याकडे सुरज पाटील यांनी स्वतःला झोकून द्यावे . आपल्या कार्यक्षेत्राची मर्यादा खानापूर विधानसभा मतदार संघ, प्रसंगानुरूप जिल्हाभर वाढवावी .
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री जयंतराव पाटील यांचा जिल्ह्यातला मुख्य विश्वासू कार्यकर्ता हे स्थान सुरज पाटील यांनी स्वकर्तृत्वाने निर्माण करावे . येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये राजारामबापू हायस्कूल आटपाडी , न्यू हायस्कुल घरनिकी या दोन प्रशाला राज्यात आदर्श ठरतील, अशा चौफेर प्रगत कराव्यात, अशा अपेक्षाही सादिक खाटीक यांनी आपल्या शुभेच्छा पर भाषणात व्यक्त केल्या .
प्रशालेतील सहशिक्षक माणीकराव साळूंखे यांनी, राजारामबापू हायस्कुलला जोडूनच कन्या महाविदयालय येथे सुरु व्हावे . इमारतीची भव्यता ही मार्गी लागावी अशी अपेक्षा व्यक्त केली .
प्रशालेतील सह शिक्षक एस . एस . कदम सर यांनी उत्तम असे शुभेच्छापर भाषण केले .
राजारामबापू हायस्कुल आटपाडी आणि न्यू हायस्कुल घरनिकी या दोन्ही प्रशाला महाराष्ट्रात सर्वहृष्ट्या सर्वसंपन्न ठरण्यासाठी मी प्रयत्न करणार आहेच . त्याचबरोबर सादिकभैय्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांना खरे उतरण्यासाठी येणारी पंचवार्षिक समर्पित करणार असल्याचे मत आपल्या सत्काराला उत्तर देताना सुरज पाटील यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्तावीक व सुत्रसंचालन गणेश ऐवळे सर यांनी केले .
कुरेश कॉन्फरन्स भारतच्या राष्ट्रीय कोअर कमेटीत नियुक्ती झाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने सादिक खाटीक यांचा सन्मान करणेत आला .
यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष प्रशांत मोटे , सरचिटणीस नितीन डांगे, भारत मोटे, एम . बी . देवकर सर , जे . व्ही . मोटे, ए . ए . जाधव, एम. एस. सनदी, एस . बी . पाटील, एम . बी . मरभळ, ए . एच . जाधव, एम . एस . कोरवी मॅडम, एस . एस . पाटील मॅडम, एस . एस . हिंगमीरे, एस . एस . चव्हाण मॅडम, आर . एस . खंदारे मॅडम इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते .


