आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
राजकीय क्षेत्रात खळबळ ,समीकरणांमध्ये उलथापालथीची शक्यता
आटपाडी (प्रतिनिधी):
आटपाडी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण होत चालले असून, संतोष प्रल्हाद पाटील (एस. पी.) यांच्या उमेदवारीकडे वार्ड नंबर ३ मधील संपूर्ण जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. लहानपणापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या पाटील यांना सध्या जनतेकडून सर्वपक्षीय पाठिंबा मिळत असून, त्यांचे नाव जनतेच्या मनात उमेदवार म्हणून निश्चित होत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
विशेषतः प्रभाग क्रमांक तीनमध्ये संतोष पाटील यांच्या वाढत्या प्रभावामुळे इच्छुक असणाऱ्याची झोप उडाली आहे. मतदारवर्गात त्यांच्याविषयी असलेली सकारात्मक भावना आणि त्यांच्या कार्याचा भक्कम पायाभूत आधार पाहता, विरोधक देखील त्यांच्या उमेदवारीविषयी संमतीच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट होत आहे.
‘एस. पी. कन्स्ट्रक्शन’ या नावाने बांधकाम विभागाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील गोरगरीब आणि उपेक्षित घटकांसाठी सातत्याने मदतीचा हात पुढे केला आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहणे, जनतेशी थेट संपर्क ठेवणे आणि लोकहितासाठी धडपड करणे, सर्वांच्या दुःखात अग्रस्थानी असतात ही त्यांची ठळक कार्यशैली बनली आहे.
खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुहास बाबर यांचे कट्टर समर्थक असून, आटपाडी तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील यांचे ते विश्वासू सहकारी आणि निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.यांचा त्यांना लाभलेला पाठींबा, त्यांच्या राजकीय प्रवासाला अधिक विश्वासार्हतेची जोड देतो. युवकांमध्ये त्यांची विशेष लोकप्रियता असून, “जेथे अन्याय, तेथे संतोष पाटील अग्रस्थानी” ही प्रतिमा जनमानसात बळकट झाली आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्यांचा चाहता वर्गही मोठा झाला आहे. गरजूंसाठी धावून येणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
संतोष पाटील यांनी जनतेच्या आग्रहास्तव निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून, अधिकृत उमेदवारी जाहीर होताच तालुक्यात एक नवा राजकीय चेहरा उभा राहील, हे निश्चित आहे. त्यांच्या उमेदवारीच्या संभावनेनेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी निवडणूक ‘जनतेतून होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संतोष पाटील यांना मिळत असलेला जनतेचा पाठिंबा आणि विरोधकांची उमेदवारीबाबतची संमती, हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद ठरते. त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकीत एक नवा संघर्ष पाहायला मिळेल.







