प्रहार दिव्यांग संघटनेचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन..
दिव्यांगांचे हृदय सम्राट आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी प्रहार दिव्यांग संघटनेचे विविध मागण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाध्यक्ष रामदास कोळी या़ंच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनच्या प्रमुख मागण्यानमध्ये.. 1)शासन निर्णयानुसार आमदार खासदार 5% दिव्यांग निधी नियमितपणे खर्च करावा. 2) शासन निर्णयानुसार पालकमंत्री,जिल्हाधिकारी,आमदार यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा व तालुका स्तरावरील समित्या ताक तात्काळ स्थापन करण्यात याव्यात. 3) सर्व दिव्यांगाना एकसमान 2500 रुपये मासिक पेन्शन देण्यात यावी. 4) जिल्हा नियोजन समिती निधीतील 1% रक्कम दिव्यांग विकासासाठी खर्च करण्यात यावा. 5) भूमिहीन बेघर दिव्यांगांना व विधवा महिलांना एक गुंठा सरकारी जागा राहण्यासाठी द्याव्यात. 6) दिव्यांगांना अंतोदय योजनेचा लाभ 21000 रुपये उत्पन्नाची आठ न लावता द्यावी. 7) सांगली शहराच्या ठिकाणी दिव्यांग भवन नसल्याने गेस्ट हाउस ची रूम व हॉल राखीव ठेवण्यात यावा. 8) शहरी भागात व ग्रामीण भागातील दिव्यांगासाठी दुकान गाळे 5% आरक्षणानुसार देण्यात यावेत. 10) दिव्यांगांना शहरी भागामध्ये स्वच्छतागृहाची सार्वजनिक ठिकाणी व सर्व शासकीय कार्यालयात व्यवस्था करण्यात यावी. 11) जिल्ह्यातील सर्वच शासकीय निमशासकीय विभागातील दिव्यांग कर्मचारी,अधिकारी यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्राची सखोल चौकशी व पडताळणी करण्यात यावी. 12) दिव्यांगांना आपत्याची अट न लावता पेन्शन चालूच ठेवण्यात यावी. 13) दिव्यांगांना मोटर सायकल व चार चाकी वाहनांचे लायसन देताना सर्जन यांचा दाखला ग्राह्य धरण्यात यावा. 14) दिव्यांगांना ड्रायव्हिंग लायसन्स बाबत फिटनेस घेण्यासाठी योग्य ती सामग्री सांगली जिल्ह्यातच असावी. 15) दिव्यांगांना पाच टक्के आरक्षणा नुसार औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मॉलमध्ये पेट्रोल पंपा वरती प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये व निमशासकीय कार्यालयामध्ये दिव्यांगांना कर्मचारी म्हणून समाविष्ट करण्यात यावेत. 16) म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेमध्ये दिव्यांगांना 5% आरक्षण राखीव करण्यात यावे. 17) सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय कार्यालयामध्ये स्वयंरोजगार करीता दिव्यांगांना स्टॉल देण्यात यावेत.
या आंदोलनामध्ये उपस्थित जिल्हाध्यक्ष रामदास कोळी,जिल्हा उपाध्यक्ष झाकीर मुजावर,जिल्हा उपाध्यक्ष सुमित पवार,जिल्हा सचिव संजय कदम, जिल्हा महिला अध्यक्ष स्वाती भस्मे जिल्हा महिला सचिव कल्पना दबडे, जिल्हा समन्वयक नागराज चांदकोटी, सोमनाथ लोहार, जिल्हा मार्गदर्शक शफिक खलिफा, तासगाव तालुका अध्यक्ष दिनकर जाधव,पलूस तालुका अध्यक्ष सूर्यकांत सुतार, कडेगाव तालुका अध्यक्ष प्रमोद कुंभार,आटपाडी तालुका अध्यक्ष उमेश लांडगे,वाळवा तालुका अध्यक्ष प्रदीप माने,मिरज तालुका अध्यक्ष मलाप्पा बंडगर,शिराळा तालुका महिला अध्यक्षा संगीता गोसावी,जत तालुका संपर्कप्रमुख रियाज शेख,जत तालुका कार्याध्यक्ष लक्ष्मण कोळी,पलूस तालुका सचिव राजू सुतार,पलुस तालुका उपाध्यक्ष संजय चौगुले,आटपाडी तालुका महिला अध्यक्षा माया माने,वाळवा तालुका उपाध्यक्ष नश्मु मुल्ला,जयवंत माने, दिनकर साळुंखे,कडेगाव तालुका सचिव अधिकराव माने,मिरज तालुका उपाध्यक्ष प्रवीण पांढरे, मिरज तालुका सचिव भास्कर भंडारे,जालिंदर भंडारे,आप्पा कनवडे उज्वला परीट व सर्व प्रहार दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


