• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Wednesday, September 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आषाढी वारीसाठी महाराष्ट्राची जीवन वाहिनी सज्ज !विशेष प्रतिनिधी पंढरपूर: जयराम शिंदे

माणगंगा by माणगंगा
July 25, 2026
in Uncategorized
0
आषाढी वारीसाठी महाराष्ट्राची जीवन वाहिनी सज्ज !विशेष प्रतिनिधी पंढरपूर: जयराम शिंदे

आषाढी वारीसाठी महाराष्ट्राची जीवन वाहिनी सज्ज !

विशेष प्रतिनिधी पंढरपूर: जयराम शिंदे

पंढरपुरातील चंद्रभागा बस स्थानकावर राज्यभरातील एसटी बसाचा महासागर ; लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सतर्कवारकऱ्यांच्या सुरक्षित, सुरळीत व सन्मानपूर्वक प्रवाशांसाठी महाराष्ट्रातील सर्व विभागांतील अधिकारी, वाहतूक नियंत्रक, वाहतूक निरीक्षक, यांत्रिक पथके व कर्मचारी 24 तास सेवेत ;कोणतीही हलर्गर्जी खपवून घेतली जाणार नसल्याचा प्रशासनाचा चा स्पष्ट संदेश,

विशेष प्रतिनिधी पंढरपूर: जयराम शिंदे

आषाढी वारी निमित्त श्री विठ्ठल रुक्मणी च्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूर मध्ये दाखल होत असताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) जीवन वाहिनी पूर्ण क्षमतेने भक्तांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. चंद्रभागा यात्रा बस स्थानक परिसरात राज्यातील विविध विभागातून आलेल्या शेकडो एसटी बस यांचे भव्य पार्किंग करण्यात आले असून, वारकऱ्यांच्या प्रवासात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. पंढरपूर हे केवळ धार्मिक केंद्र नसून महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचे हृदय मानले जाते.

आषाढी वारीच्या काळात लाखो भाविक एकाच वेळी किती दाखल होत असल्याने वाहतूक, सुरक्षा, बस व्यवस्थापन आणि तांत्रिक देखभाल या सर्व बाबीवर मोठा ताण निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने राज्यातील सर्व विभागांतील बस , अधिकारी आणि कर्मचारी यांची विशेष नियुक्ती करून प्रवासी सेवेची व्यापक यंत्रणा उभारली आहे. चंद्रभागा यात्रा बस स्थानक परिसरात राज्यभरातून आलेल्या एसटी बसच्या रांगा पाहताना महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची ताकद अनुभवायला मिळते.

मुंबई, पुणे, सातारा, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, सोलापूर नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे नंदुरबार अकोला वर्धा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड वाशिम परभणी हिंगोली लातूर धाराशिव इतर विभागातील बस पंढरपूर मध्ये दाखल झाल्या असून वारकऱ्यांच्या सेवेसाठी सतत धावत आहेत. प्रवाशाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राध्यांना देत प्रत्येक बसची तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे. यांत्रिक अभियंते, मेकॅनिकल स्टाफ दुरुस्ती पथके आणि देखभाल कर्मचारी सतत कार्यरत असून कोणतीही बस बिघाडामुळे बंद पडू नये यासाठी आवश्यक सुट्टे भाग, उपकरणे आणि तांत्रिक मदत उपलब्ध ठेवण्यात आली आहे.

वाहतूक नियंत्रक, वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, स्थानक प्रमुख आणि प्रशासकीय अधिकारी यांची विशेष नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक बसच्या आगमन–विसर्गावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. बस स्थानकात गर्दीचे नियोजन, प्रवाशांना योग्य मार्गदर्शन, वेळापत्रकाचे पालन आणि अतिरिक्त बस उपलब्धता यावर सतत नियंत्रण ठेवले जात आहे. वारकरी दरम्यान महिला पासून जेष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.

बस स्थानकात माहिती केंद्र मदत कक्ष, प्रवासी मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आला आहेत.एसटी प्रशासनाने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या असून कर्तव्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. प्रवाशांनी नम्र वर्तन, तातडीने मदत, वेळेवर बस उपलब्ध करून देणे आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे ही प्रत्येक कर्मचाऱ्यांची जबाबदारी असल्याचे प्रशासनाने अधोरेखित केले आहे.

आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. लाखो वारकऱ्यांच्या विश्वास, श्रद्धा आणि सुरक्षित प्रवास हीच एकटीची खरी जबाबदारी असल्याची भावना कर्मचारी वर्गामध्ये दिसून येते आहे आणि अधिकारी आणि कर्मचारी सलग अनेक तास कर्तव्य बजावत असून वारकऱ्यांच्या सेवेला त्यांनी प्राधान्य दिले आहे. प्रवाशाच्या सोयीसाठी अतिरिक्त फेऱ्या, आवश्यकतेनुसार बस उपलब्ध करून देणे, गर्दीच्या वेळेत विशेष नियोजन आणि बस स्थानकातील सतत देखरेख यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळत आहे कोणतीही अनुचित घटना घडू नये, प्रवाशाची गैरसोय होऊ नये आणि वारीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सर्व यंत्रणा 24 तास सज्ज असल्याचे चित्र पंढरपुरात पाहायला मिळत आहे.

चंद्रभागा बस स्थानकावर निर्माण झालेली वाहतुकीची व्यवस्था, शिस्तबद्ध बस पार्किंग, सतत सुरू असलेले नियंत्रण आणि तांत्रिक सज्जता पाहता एसटी प्रशासनाने हिंद्याच्या वारीसाठी व्यापक नियोजन केल्याची स्पष्ट दिसून येते, राज्यातील प्रत्येक विभागाने या सेवेत सहभाग नोंदवल्यामुळे ही व्यवस्था अधिक सक्षम बनली आहे.

आषाढी वारी म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नसून जनसेवीची मोठी परीक्षा आहे. परीक्षेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुन्हा एकदा आपली “जनतेची जीवन वाहिनी “ही ओळख जपण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.

लाखो भाविकांना सुरक्षितपणे त्यांच्या गतव्यवस्थांनी पोहोचविण्यासाठी राज्यातील सर्व विभागांचे अधिकारी, चालक, वाहक यांत्रिक कर्मचाऱी आणि प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र कार्यरत असल्याचे पंढरपुराच्या चंद्रभागा यात्रा बस स्थानकावर दिसून येत आहे, फोटो ओळी : पंढरपूर बस स्थानक समोर झालेली राज्यातील भाविकांची गर्दी (जयराम शिंदे)

Views: 50
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या -पेन वाटप

गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या -पेन वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)