• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

आठवणींच्या हिंदोळ्यावर…आणीबाणीनंतरचे बाळासाहेब देवरसांचे झालेले अभूतपूर्व स्वागत ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत

माणगंगा by माणगंगा
August 20, 2026
in Uncategorized
0
घ्या समजून राजेहो..बौद्धिक नक्षलवाद: एक चिंतन… ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*आठवणींच्या हिंदोळ्यावर…**आणीबाणीनंतरचे बाळासाहेब देवरसांचे झालेले अभूतपूर्व स्वागत* ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत

!!जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.१९७५ च्या जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारत देशात आणीबाणी लावली. देशातील सर्वच प्रमुख इंदिरा गांधी विरोधी नेत्यांना त्यांनी मिसाखाली तुरुंगात डांबले. त्यामुळे देशभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.आठवडाभरातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना नागपुरात अटक करून विमानाने मुंबईला नेण्यात आल्याची बातमी आली.

लगेचच एक दोन दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली असल्याची घोषणा झाली. देशभर संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले होते. नंतर देशभर संघ स्वयंसेवकांनी सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घेतली होती. त्यातील अनेकांना दोन महिने तीन महिने अशी तुरुंगवासाची शिक्षा देखील झाली होती, तर त्यातल्या अनेकांना संपूर्ण काळ तुरुंगात ठेवण्यात आले होते. सुमारे दीड वर्ष हीच परिस्थिती होती. “उभा देश झाला आता एक बंदिशाला” अशीच देशात परिस्थिती होती. जानेवारी १९७७ मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी अंशतः शिथिल करत देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यामुळे राजकीय नेत्यांना बाहेर सोडण्यात आले.

मात्र संघाचे अधिकारी आणि तुरुंगात असलेले कार्यकर्ते अद्याप बाहेर आले नव्हते. मार्च १९७७ मध्ये लोकसभेसाठी मतदान झाले. मतदान आटोपल्यावर मतमोजणी सुरू झाली. मतमोजणीत जागोजागी काँग्रेसचे उमेदवार माघारताना दिसत होते, इतकेच काय पण स्वतः इंदिरा गांधी रायबरेलीतून आणि त्यांचे सुपुत्र सुपर प्राईम मिनिस्टर संजय गांधी हे देखील अमेठीतून माघारल्याची बातमी येत होती. मात्र त्यावेळी रेडिओ आणि टीव्हीवरून ही बातमी बराच वेळ जाहीर केली जात नव्हती. रविवारच्या सकाळी मतमोजणी सुरू झाली होती. मात्र रात्री ११ पर्यंत इंदिरा गांधी आणि संजय गांधी माघारल्याची बातमी दिली जात नव्हती. रात्री बारानंतर आकाशवाणीने ही बातमी द्यायला सुरुवात केली. सोमवारी पहाटेपर्यंत इंदिरा गांधी पराभूत होणार हे चित्र स्पष्ट झाले होते. काँग्रेसला देखील जबरदस्त पिछेहाट स्वीकारावी लागली होती. सोमवारी सकाळच्या सर्व वृत्तपत्रांमध्ये इंदिराजी पराभूत काँग्रेसवर वज्राघात अशा बातम्या झळकल्या होत्या.

सोमवारी सकाळी इंदिरा गांधींनी पराभव मान्य करत मंत्रिमंडळाची शेवटची बैठक बोलावली. त्यात आणीबाणी रद्द करून सर्व बंदी घातलेल्या संघटनांवरील बंदी हटवण्याची घोषणा केली आणि सर्व राजबद्यांची तात्काळ सुटका करण्यात येईल असे घोषित केले. यामुळे देशभर आनंदाची लाट पसरली होती. त्यादिवशी दुपारपासूनच सर्व राजकीय कैदी म्हणजेच मिसाबंदी सोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. नागपुरात दुपारी तीन पासूनच सर्व संघाचे अधिकारी सोडण्यात आले होते. परिणामी नागपूरच्या सेंट्रल जेल समोर संघ स्वयंसेवक आणि इतर नागरिकांनी प्रचंड जल्लोष केला होता. त्याचवेळी नाशिकच्या तुरुंगात असलेले संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचीही सुटका झाल्याची बातमी आली. त्यामुळे तर उभ्या नागपुरात एकच जल्लोष करण्यात आला.

दुसऱ्याच दिवशी बाळासाहेब देवरस बुधवारी कलकत्ता मेलने नागपुरात पोहोचत असून त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे, तसेच त्यांचा कस्तुरचंद पार्कवर भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये झळकली. त्यावेळी मी मुंबई दूरदर्शनचा वृत्त छायाचित्रकार म्हणून नागपुरात कार्यरत होतो. मला त्याच दिवशी दुपारी दूरदर्शनचे वृत्त विभागाचे निर्माते डॉ. गोविंद गुंठे यांनी फोनवर बाळासाहेबांचे स्वागत दूरदर्शनसाठी तुला कव्हर करायचे आहे असा निरोप दिला. ठरल्याप्रमाणे बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास मी नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचलो होतो. त्यावेळी कलकत्ता मेल नागपूर रेल्वे स्टेशनवर सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी पोहोचत असे. मात्र तिथे गेल्यावर ती थोडी लेट होणार आहे अशी माहिती मिळाली. नेहमी कलकत्ता मेल प्लॅटफॉर्म नंबर तीन वर थांबायची. मात्र त्यादिवशी ती प्लॅटफॉर्म नंबर एक वरच थांबणार आहे अशीही माहिती मिळाली

प्लॅटफॉर्म नंबर एक वर मी पोहोचलो, तेव्हा काही तुरळक संघ कार्यकर्ते आणि वृत्तपत्रांचे छायाचित्रकार पोहोचलेले दिसत होते. त्यांच्याशी गप्पा मारत मी गाडीची वाट पाहत हातात कॅमेरा सज्ज करून उभा होतो. हळूहळू गर्दी वाढू लागली आणि पावणे अकराच्या सुमारास प्लॅटफॉर्म नंबर एकवर मुंगी देखील फिरायला जागा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस बंदोबस्त अगदी चोख ठेवल्या गेला होता.अकराच्या सुमारास कलकत्ता मेल रुळावरून येताना दिसली. मात्र ती यार्डातच थांबवली गेली. तितक्यात थांबलेल्या त्या गाडीतून नागपूरच्या दैनिक तरुण भारतचे ज्येष्ठ छायाचित्रकार जयंत हरकरे हातात कॅमेरा घेऊन प्लॅटफॉर्मकडे धावत येताना दिसले. धावता धावताच त्यांनी आम्हाला ओरडून सांगितले की बाळासाहेब एसी च्या डब्यात आहेत. ते प्लॅटफॉर्मवर येऊन दम घेत असतानाच त्यांनी सांगितले की ते काल रात्रीच अकोल्याला जाऊन थांबले होते आणि सकाळी अकोल्यापासूनच गाडीत चढून त्यांनी प्रत्येक स्टेशनवर बाळासाहेबांच्या स्वागताचे झालेले फोटो काढतच आले होते.

गाडी जशी प्लॅटफॉर्मवर शिरली तसा प्लॅटफॉर्मवर राष्ट्रभक्ती तेरा नाम आर एस एस आर एस एस चा जोरदार नारा दिला गेला. हळूहळू गाडी स्लो झाली. आम्ही सर्व छायाचित्रकार साधारणपणे एसीचा कोच जिथे येतो तिथेच थांबलो होतो. कोच जवळ येताच तिथे दरवाज्यात बाळासाहेब घेऊन उभे असलेले दिसले. उपस्थितांच्या उत्साहाला आणि आनंदाला अक्षरशः उधाण आले होते. गाडीला अक्षरशः लटकत कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांना जाऊन पुष्पहार घातले. ते गाडीच्या खाली उतरले, तसे संघाच्या सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. मग गर्दीतून वाट काढत ते हळूहळू पुढे निघायला लागले. मात्र दोन्ही बाजूंनी त्यांच्यावर पुष्पवर्षाव होत होता, गुलाल उधळला जात होता. त्याचवेळी राष्ट्रभक्ती तेरा नाम आर एस एस, आर एस एस, राष्ट्रभक्ती जीत गई, संघ बंदी हट गई, जेल के ताले टूट गये.‌ राज बंदी छूट गये, भारत माता की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला होता. बाळासाहेब जसे गर्दीतून हळूहळू पुढे सरकत होते, तसे आम्ही सर्व छायाचित्रकार उलटे चालत त्यांच्या स्वागताचे छायाचित्रण करत होतो.

हळूहळू प्लॅटफॉर्मच्या मुख्य दरवाजापर्यंत आलो. बाहेर येताच अजूनच जोरदार घोषणांनी परिसर दणाणला होता तिथे देखील नागरिकांची अक्षरशः दाटीवाटी झाली होती. मुक्तहस्ताने फुलांची उधळण होत होती.इथून पुढे सरकत बाळासाहेब रेल्वे स्टेशनच्या पोर्चमध्ये आले. तिथून बाहेर येताच पोर्चच्या समोरच एक व्यासपीठ तयार करण्यात आले होते. त्या व्यासपीठावर बाळासाहेबांना उभे करण्यात आले. तिथे उभे राहून बाळासाहेबांनी उपस्थित आमचे स्वागत स्वीकारले. त्यावेळी संघाचे इतर अधिकारी देखील त्यांच्यासोबत तिथे उभे झाले. संपूर्ण रेल्वे स्टेशनच्या परिसरात प्रचंड गर्दी झाली होती आणि जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. नंतर एका उघड्या जीपवर बाळासाहेब देवरस विराजमान झाले आणि जीप पुढे सरकायला सुरुवात झाली. त्यांच्याच जिपसमोर आणखी एक उघडी जीप ठेवली होती. त्यात आम्ही सर्व छायाचित्रकार चढलो होतो.उघडी जीप आणि त्यामागे सर्व कार्यकर्ते रेल्वे स्टेशन वरून निघाले आणि जवळच्याच सीताबर्डी टेकडीच्या गणपतीपाशी पोहोचले. तिथे बाळासाहेब जीपमधून खाली उतरले आणि त्यांनी टेकडीवर चढून तिथल्या गणपतीचे दर्शन देखील घेतले. मग त्यांची ती मिरवणूक पुढे निघाली. ही मिरवणूक मग लोखंडी पूल, आनंद टॉकीज, श्री टॉकीज, झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, महाराज बाग चौक, बोले पेट्रोल पंप असे करत सिविल लाईन्स मधील घटाटेंच्या बंगल्यावर पोहोचली. बाबासाहेब घटाटे त्यावेळी संघाचे नागपूर प्रांत संघचालक होते. त्यांच्याच बंगल्यावर बाळासाहेबांचा त्यादिवशी मुक्काम राहणार होता. रेल्वे स्टेशन ते घटाटे बंगला या रस्त्यावर दुतर्फा नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

ठीक ठिकाणी बाळासाहेबांच्या जीप वर पुष्पदृष्टी पुष्पवृष्टी केली जात होती. लोखंडी पूल आनंद टॉकीज झाशी राणी चौक व्हेरायटी चौक महाराज बाग चौक इथे अनेक नागरिकांनी थांबून बाळासाहेबांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले होते. जीप वर उभा राहून मी जमेल तेव्हा दूरवर नजर टाकत होतो तर सर्वत्र नुसती गर्दीच गर्दी दिसत होती. घटाटे बंगल्यावर देखील त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी भोजनोत्तर बाळासाहेबांनी रेशीम बागेत जाऊन तिथे डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीचे दर्शन घेतले. तिथे देखील त्यांच्या स्वागतासाठी स्वयंसेवक मोठ्या संख्येत गोळा झाले होते. संध्याकाळी पाच वाजता घाटाटे बंगल्यावर नागपूरातील सर्व धर्मीय मान्यवरांशी त्यांचा संवाद ठरला होता. तिथे देखील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दत्ताजी डिडोळकर यांनी या बैठकीचे संचालन केले होते. तसेच नागरी सत्कार समितीचे देखील तेच प्रमुख होते.त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता कस्तुरचंद पार्क मैदानावर बाळासाहेबांचा भव्य नागरिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सुप्रसिद्ध सर्वोदयी कार्यकर्ते रा. कृ. पाटील त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमाला देखील नागपूरकर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. कस्तुरचंद पार्क अगदी खचाखच भरला होता असे म्हटले तरी चुकीचे ठरु नये. त्यावेळी तब्बल दीड वर्षांनी बाळासाहेबांचे नागरिकांना उद्देशून उद्बोधन झाले. १९७७ साली माझे वय जेमतेम २२ वर्षांचे होते. त्यापूर्वी देखील रेल्वे स्थानकावरची काही स्वागते मी पाहिली होती. त्यानंतर देखील पत्रकारितेच्या कार्यकाळात अनेकदा रेल्वे स्टेशनवर मान्यवरांचे स्वागताचे वृत्त संकलन करण्यासाठी मी गेलो होतो. मात्र हे अभूतपूर्व स्वागत कायम माझ्या लक्षात राहिले आहे.

Views: 29
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
आर्यारवी एंटरटेनमेंट’तर्फे राज्यस्तरीय भव्य एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन;5 सप्टेंबर, 2026 पर्यंत नोंदणीची संधी

आर्यारवी एंटरटेनमेंट’तर्फे राज्यस्तरीय भव्य एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन;5 सप्टेंबर, 2026 पर्यंत नोंदणीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)