• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Tuesday, September 22, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

स्पष्ट आणि परखड…सर्वच आयोजनांमध्ये डीजेच्या वापरावर बंदी घालायलाच हवीज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

माणगंगा by माणगंगा
September 5, 2026
in Uncategorized
0
स्पष्ट आणि परखड…सर्वच आयोजनांमध्ये डीजेच्या वापरावर बंदी घालायलाच हवीज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

*स्पष्ट आणि परखड…**सर्वच आयोजनांमध्ये डीजेच्या वापरावर बंदी घालायलाच हवी*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.यंदाचा गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन पोहोचला आहे. त्याच वेळी गणेशोत्सवातील डीजे वाजवण्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. या वादाचे स्वरूप आता फक्त शाब्दिक राहिले नसून प्रकरण मुद्यांवरून गुद्द्यावर आलेले दिसते आहे.

वस्तूतः सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना एकूण विसाव्या शतकात लोकमान्य टिळकांनी सर्वप्रथम आणली. त्यामागे लोकजागृती करणे आणि जनसामान्यांना इंग्रजांविरुद्ध संघर्ष करण्यासाठी उद्युक्त करणे हीच भावना होती. टिळकांच्या संकल्पनेला त्यावेळी लोकप्रतिसाद मिळाला आणि स्वातंत्र्यलढा उभा झाला‌. देशाला स्वातंत्र्य ही मिळाले. मात्र नंतरच्या काळात गणेशोत्सवाचे स्वरूप हे लोकशिक्षणाचे न राहता हिडीस असे झाले आहे हे नाईलाजाने मान्य करावेच लागते.

आज गणेशोत्सवाचे जे काही स्वरूप झाले आहे त्यावर यापूर्वी देखील मी लिहिले आहे. मात्र या सार्वजनिक गणेशोत्सवा समोर दहा दिवस डीजे लावून जो धांगडधिंगा केला जातो आणि ज्यामुळे ध्वनी प्रदूषण होते तो प्रकार बंद केला जावा अशी मागणी पुण्यातील विद्यानंद बापट नामक संवेदनशील तरुणाने केली. त्यावरून वाद सुरू झाला आहे. आता डीजे हवा की नको या मुद्द्यावर भांडण सुरू झाले असून चक्क दोन गट पडलेले दिसत आहेत. एक गट डीजे हवा म्हणून आग्रही आहे तर दुसऱ्याचा डीजे नको म्हणून आक्रोश सुरू आहे. वस्तुतः डीजे आणि त्याबरोबर वापरली जाणारी डॉल्बी तसेच लेझर लाईट यामुळे पर्यावरणाचा समतोल ढळतो आणि मानवी आरोग्यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो.

विशेषतः डीजेच्या दणदणाटाने कानठळ्या बसतात. लहान मुले किंवा वयोवृद्ध यांच्या आरोग्यावर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे या डीजेवर बंदी ही घातली जायलाच हवी. मात्र गणेशोत्सव मंडळांना तो आपला हक्क असल्याचे वाटते आहे. त्यातूनच पुण्यात महापालिकेत या संदर्भात होणाऱ्या बैठकीत विद्यानंद बापट यांना बोलूच दिले नाही आणि ते बाहेर आल्यावर त्यांना काही गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचे वृत्त आहे. हा प्रकार निषेधार्हच म्हणावा लागेल. पुण्यात हा प्रकार सुरू झाला असतानाच नागपुरात माजी महापौर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे भाजपचे संदीप जोशी यांनी देखील नागपुरात डीजेवर बंदी घालावी अशी मागणी केली. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी लगेचच कारवाई करत कालपासून तर नोव्हेंबर पर्यंत डीजेच्या वापरावर बंदी घोषित केली. त्यामुळे संताप्त झालेले भाजपचेच दुसरे माजी महापौर प्रवीण दटके आणि दयाशंकर तिवारी यांनी आक्षेप घेतला. त्यांचे म्हणणे असे आहे की हिंदूंच्या सणाच्या वेळेसच ही बंदी का घातली गेली?

हा मुद्दा देखील निश्चितच विचार करण्याजोगा आहे. डीजे आणि लेझर लाईट फक्त गणेशोत्सवातच वाजवले जातात असे नाही तर दहीहंडीला देखील वाजवले जातात. नागपुरात तान्ह्या पोळ्याच्या दिवशी निघणाऱ्या मारबतीत देखील डीजे वाजवला जातो. याशिवाय मग दुर्गा उत्सव शारदोत्सव मग ख्रिसमस ३१ डिसेंबर नववर्षाचे स्वागत ताजुद्दीन बाबाच्या दर्ग्यावर चादर चढवण्याचा संदल शरीफ चा कार्यक्रम मोहरम चे जुलुस, इतकेच काय पण राजकीय नेत्यांचे वाढदिवस आणि श्रीमंतांकडे विवाह सोहळे यात देखील डीजे वाजवला जातो आणि त्याचा दणदणात जनसामान्यांच्या कानाचे पडदे वाढत असतो. मात्र आपल्या देशात हिंदूंच्या सणाच्या वेळेस पर्यावरणाचा मुद्दा पुढे केला जातो आणि बंदी घातली जाते.

मात्र अन्य धर्मीयांना सूट दिली जाते. दिवाळीत फटाक्यांनी प्रदूषण होते असे म्हणताना ख्रिसमस चे प्रदूषण मात्र दुर्लक्ष केले जाते. म्हणूनच नागपुरात भाजप नेत्यांनी हा आक्षेप घेतला आहे असे म्हणता येते.इथे एक मुद्दा असा उपस्थित केला जातो की मग आम्ही सण साजरे करायचेच नाही का? मात्र डीजे न लावता देखील तुम्हाला सण साजरे करता येतातच ना. पूर्वी जेव्हा डीजे नव्हता तेव्हा गणेश मूर्ती आणण्याच्या आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुकी म्हणजे काही मूक मोर्चे नसायचे. तिथे देखील टाळ मृदुंगाचा नाद होतच होता. ढोल ताशे वाजवले जातच होते. आज वर्षानुवर्षे प्रत्येक आषाढी एकादशीला ठीक ठिकाणी पंढरपूरला वारकऱ्यांच्या पायी दिंड्या जातात. या दिंडीत वारकरी टाळ मृदुंगाचा नाद करत चालत जातात आणि संपूर्ण वातावरण भरून टाकतातच ना. मग मग सणाच्या नावावर उत्सवाच्या नावावर स्पीकर्सची भली मोठी भिंत उभी करायची आणि त्यातून ध्वनी प्रदूषण निर्माण करायचे हे कितपत योग्य आहे, याचाही विचार व्हायला हवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या शताब्दी वर्षानिमित्त पंचपरिवर्तनाचा नारा दिला आहे. त्यात एक सूत्र हे पर्यावरणाचे रक्षण हे देखील आहे. ध्वनी प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो हे वास्तव नाकारता येत नाही नागपुरात डीजे विरोधक संदीप जोशी आणि डीजे बंदीला विरोध करणारे प्रवीण दटके तसेच दयाशंकर तिवारी हे सर्वच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. फक्त नागपुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव दुर्गा उत्सव आणि शारदोत्सवात संघ स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत.

ठिकठिकाणी होणाऱ्या दहीहंड्या देखील संघ स्वयंसेवक आयोजित करत असतात. त्यांनी तरी किमान हे ध्वनी प्रदूषण टाळावे असे सुचवावेसे वाटते. मात्र नागपुरात संघ कार्यालयाजवळच असलेल्या बडकस चौकात होणार असलेल्या दहीहंडीच्या आयोजकांनी आम्ही पोलिसांचा आदेश मानणार नाही आणि डीजे वाजवणारच असा निर्धार जाहीर केला आहे. माझ्या माहितीनुसार ही सर्व मंडळी विश्व हिंदू परिषदेची म्हणजेच संघाशी संबंधित आहेत. मग त्यांनी तरी ध्वनी प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न का करू नये असा प्रश्न विचारावासा वाटतो. अशा परिस्थितीत संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या सर्व स्वयंसेवकांना देशभर डीजे मुळे होणारे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना द्यायला हव्या असे माझे मत आहे.या पार्श्वभूमीवर आता हे प्रकरण फक्त पोलीस आयुक्तांपर्यंत थांबू नये, तर एकूणच महाराष्ट्र राज्यात धर्म पंथ जात भेद न पाळता सर्व धर्मांच्या कोणत्याही आयोजनात डीजेचा वापर करण्यावर सरसकट बंदी घातली जावी ही फक्त माझीच नाही तर अनेक सामान्य नागरिकांची मागणी आहे. त्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील अशी आशा करायला हरकत नसावी.

Views: 39
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)