कोल्हापूर दि . ११ ( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल)
उद्या मंगळवारी (दि.१२ ) रोजी जोतिबाचा जागर होणार आहे . आज पाचव्या माळेला जोतिबाची पाचकमळ पुष्पात महापुजा बांधण्यात आली होती .
नवरात्रोत्सवाचा जोतिबा देवाचा जागर इतर देवदैवताच्या आधी साजरा होतो . मंगळवारी जागरा निमित्त श्री . जोतिबा देवाची चार मुक्तीचे प्रतिक दाखविणाऱ्या चौफुल्या मध्ये महापुजा बांधण्यात येईल. पुजेपुढे उन्मेष नावाचा अश्व ( घोडा ) अर्पण केला जातो . मंदिराच्या दरवाज्यावर सीताफळ्, कवडांळ . बेल, फुलांचे तोरण बांधले जातात. फलाहाराची पाच ताटाचा नैवेद्य वाजत गाजत यमाई मंदिराकडे जातो . उंट , घोडे ‘ वाजंत्री ‘ , देव सेवकाच्या लवाजम्यासह धुपारती सोहळा निघेल ..मंदिरात भजनाचा कार्यकम होतो . रात्रभर मंदिर खुले ठेवण्यात येते .
दरम्यान आज नवरात्रोत्सवाच्या पाचव्या माळेला जोतिबाची पाच कमळ पुष्पामध्ये महापूजा बांधली .आजची पूजा मानाचे दहा गांवकर यांनी बांधली .जोतिबा डोंगरावर स्थापित नवदुर्गाचे दर्शन स्थानिक नवरात्र उपासकांनी पायी चालत घेतले . देवाला फलाहार नैवेद्य नवरात्र उपासकांनी दाखवला . महाराष्ट बंद असुनही भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग लागली होती . रात्री डवरी गीताचा कार्यक्रम झाला .