• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, March 26, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home संपादकीय

ग्रामीण पत्रकारांच्या व्यथा मांडणारा लेख

माणगंगा by माणगंगा
November 13, 2021
in संपादकीय
0
ग्रामीण पत्रकारांच्या व्यथा मांडणारा लेख

होय, ग्रामीण पत्रकार उध्वस्त होत आहेत, त्यांची ही अवस्था पाहुन वेदना होतात, वाईट वाटते… –

ग्रामीण पत्रकारांवर कशाप्रकारे अन्याय होतोय हे मला आजही सविस्तरपणे मांडायचे आहे, आणि ग्रामीण पत्रकारीता कशी संकटात सापडली आहे, कशी उद्धवस्त होत चालली आहे, हे सुद्धा निस्वार्थपणे सर्वांसमोर आणायचे आहे. मुख्यालय किंवा जिल्हा कार्यालय असलेल्या शहरातील पत्रकारांना जरी पगार मिळत असला तरी त्यांनाही योग्य तो मोबदला आणि न्याय मिळणे गरजेचे आहे, शहरातील पत्रकारांचे आणि ग्रामीण पत्रकारांचे शासन दरबारी पत्रकार म्हणून नोंद करण्यासारखे काही मुद्दे सारखे असले तरी ग्रामीण पत्रकारांचे बहुतांश प्रश्न शहरातील पत्रकारांपेक्षा भिन्न आहेत, आज मी स्वतंत्रपणे ग्रामीण पत्रकारांची व्यथा मांडणार आहे. ग्रामीण पत्रकार नेमक्या कोणत्या परिस्थितीत जगत आहेत ? त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते ? एकुणच ग्रामीण पत्रकारीता कशी धोक्यात आली आहे ? आणि वाईट वाटण्याचे नेमके कारण काय ? हे खालील मुद्दे वाचून सर्वांच्या लक्षात नक्कीच येईल.

– महाराष्ट्रात जवळपास ८० टक्के ग्रामीण पत्रकार आहेत (अंदाजे २० हजार) हे सर्व बिनपगारी आहेत त्याचे वाईट वाटते.

– वर्षानुवर्षे ग्रामीण पत्रकार फुकटात काम करतात आणि वर्तमानपत्रही ग्रामीण पत्रकारांनी फुकटात काम करावे ही मानसिकता ठेवतात, त्याचे वाईट वाटते.

– आर्थिक स्थिती चांगली असणारे वर्तमानपत्र सुध्दा वर्षानुवर्षे ग्रामीण पत्रकारांना एक रूपयाही पगार देत नाहीत, युज अ‍ॅण्ड थ्रो ची निती वापरतात, त्याचे वाईट वाटते.

– जाहीरातीसाठी ग्रामीण पत्रकारांवर कार्यालयाकडून दबाव आणला जातो, अपमानास्पद शब्दात बोलले जाते, टार्गेट पूर्ण केले नाही तर ग्रामीण पत्रकारांना वर्तमानपत्रातून काढून टाकण्याची भाषा वापरली जाते, हुकुमशाही लादली जाते, त्याचे वाईट वाटते.

– लाचार होवून जाहीराती गोळा कराव्या लागतात आणि कार्यालयास पाठवाव्या लागतात, एवढंच नव्हे तर जाहीरातदारांनी पैसे दिले नाही तर ग्रामीण पत्रकारांना स्वतःच्या खिशातले पैसे कार्यालयात भरावे लागतात, त्याचे वाईट वाटते.

– स्वतःच्या लेखणीची ताकद न ओळखता ग्रामीण पत्रकार दुसरा चांगला वर्तमानपत्र मिळेल का या विवंचनेत वर्तमानपत्र सोडत नाही, त्याचे वाईट वाटते.

– अनेक वर्तमानपत्र ग्रामीण पत्रकारांना गुलामासारखी वागणूक देतात तरीही ग्रामीण पत्रकारांचा स्वाभिमान जागा होत नाही, त्याचे वाईट वाटते.

– ग्रामीण पत्रकार आजारी पडल्यास मदत तर सोडाच साधी विचारपूस सुध्दा वर्तमानपत्र करत नाहीत, त्याचे वाईट वाटते.

– जाहीरातीसाठी अनेक बैठका घेणारे वर्तमानपत्र पत्रकारांच्या कल्याणासाठी एक बैठक सुध्दा कधीच घेत नाहीत, त्याचे वाईट वाटते.

– वर्तमानपत्राकडून मदत तर सोडाच, कुटूंबाचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून एखाद्या छोट्याशा व्यवसायासाठी साधं मार्गदर्शन सुध्दा वर्तमानपत्र करत नाहीत, त्याचे वाईट वाटते.

– मोलमजूरी करणाऱ्या बांधवांना दिवसाला किंवा आठवड्याला किंवा महिन्याला काही पैसे तरी मिळतात मात्र ग्रामीण पत्रकारांना वर्षानुवर्षे पत्रकारीता करूनही कधीच एक पैसाही मोबदला म्हणून मिळत नाही, त्याचे वाईट वाटते.

– वर्तमानपत्रांना उत्पन्नाचे स्त्रोत हे जाहीरातच आहे हे जरी खरे असले तरी त्या जाहीराती ग्रामीण पत्रकारांनीच द्याव्यात ही सक्ती केली जाते, त्याचे वाईट वाटते.

– स्वतंत्र जाहीरात प्रतिनिधी नेमुन त्यांच्याकडून जाहीरात मिळवणे सहज शक्य असतांना ग्रामीण पत्रकारांना वेठीस धरले जाते, त्याचे वाईट वाटते.

– समाजहितासाठी (खरोखर) लढणारे वर्तमानपत्र जगले पाहीजे आणि ग्रामीण पत्रकारांनाही न्याय मिळाला पाहीजे अशी व्यवस्था निर्माण होतांना दिसत नाही, त्याचे वाईट वाटते.

– ज्या वर्तमानपत्रांची आर्थिक स्थिती ठिक नाही त्यांना दोष देत नाही, परंतु ज्यांची जाहीरातीतून कोट्यावधी रूपयांची उलाढाल होते, ते सुध्दा एक रूपयाही ग्रामीण पत्रकारांना देत नाहीत, त्याचे वाईट वाटते.

– जेव्हा एखादा वर्तमानपत्र बैठक घेवून ग्रामीण पत्रकारांना वाट्टेल ते करा, जाहीरातदारांना वाट्टेल ते बोला पण जाहीरातीचे टार्गेट पूर्ण करा असे सांगतो, त्याचे वाईट वाटते.

– एखादा वर्तमानपत्र सरळ सरळ धंदा सुरू करतो, पाठवलेल्या बातमीचं रिटर्न काय हे विचारतो, पेड न्युजचा बाजार मांडतो आणि या मानसिकतेचा पाहीजे तसा विरोध होतांना दिसत नाही, त्याचे वाईट वाटते.

– ग्रामीण पत्रकारांकडून वर्षानुवर्षे गुलामासारखे काम करून घेणाऱ्या बहुतांश वर्तमानपत्रांना आपल्याच ग्रामीण पत्रकाराच्या गावाचा रस्ता सुध्दा माहित नाही, त्याचे वाईट वाटते.

– जेव्हा एखादा वर्तमानपत्र ग्रामीण पत्रकारांकडून गॅरंटी म्हणून ( इतर कागदपत्रांसह) कोरा बाँड किंवा कोरा चेक सही करून घेतो, त्याचे वाईट वाटते.

– गॅरंटी घेणारे वर्तमानपत्र ग्रामीण पत्रकारांना चार ओळीचे नियुक्तीपत्र सुध्दा देत नाहीत, त्याचे वाईट वाटते.

– ज्या जनतेच्या न्याय हक्कासाठी ग्रामीण पत्रकार हा सर्व अन्याय सहन करतो ती जनता किंवा तो समाज केव्हाच पाठीशी उभा राहत नाही, त्याचे वाईट वाटते.

– एखादा पत्रकार चुकीचा असेलही मात्र समस्त पत्रकारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून पत्रकार पैसे घेत असतील असा अंदाज जेव्हा समाजाकडून बांधला जातो, त्याचे वाईट वाटते.

– आयुष्याची अनेक वर्षे पत्रकारीता करूनही शासन दरबारी ग्रामीण पत्रकारांची “पत्रकार” म्हणून नोंद सुध्दा नाही, त्याचे वाईट वाटते.

– शासन दरबारी अधिकृत नोंद नसल्याने ग्रामीण पत्रकारांना कुठल्याही कायद्याचा किंवा योजनेचा फायदा सहज मिळेल अशी शक्यता नाही, त्याचे वाईट वाटते.

– ग्रामीण पत्रकारांना कुटूंबाच्या पालन पोषणासाठी किंवा मुला-मुलीच्या शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी कुठलीच मदत मिळत नाही, त्याचे वाईट वाटते.

– उत्पन्नाचं साधन किंवा कुठलीही मदत नसल्याने मुलीच्या लग्नासाठीही ग्रामीण पत्रकारांना जी तारेवरची कसरत करावी लागते किंवा कर्जबाजारी व्हावे लागते, त्याचे वाईट वाटते.

– ग्रामीण पत्रकारांवर हल्ले होतात, धमक्या दिल्या जातात, मारहाण होते मात्र स्थानिक मदत मिळत नाही, इतर वर्तमानपत्र शक्यतो चार ओळीची बातमी सुध्दा छापत नाहीत, त्याचे वाईट वाटते.

– जेव्हा ग्रामीण पत्रकाराचा मुलगा किंवा मुलगी हजार पाचशे रूपयाची वस्तु पप्पा मला पाहीजे म्हणून सांगते आणि हा ग्रामीण पत्रकार बेटा नंतर घेवू म्हणून तिला परत पाठवतो, त्या पत्रकाराची हतबलता पाहुन वाईट वाटते.

– ग्रामीण महाराष्ट्र जगासमोर आणणारे आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी सतत लढा देणारे ग्रामीण पत्रकार स्वतःच अन्यायाचे बळी ठरत आहेत, त्याचे वाईट वाटते.

– ग्रामीण जनतेच्या जीवनाशी निगडीत प्रत्येक समस्या आपल्या लेखनीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणारे ग्रामीण पत्रकार स्वतःच समस्यांच्या चक्रव्युहात फसले आहेत, त्याचे वाईट वाटते.

– ग्रामीण जनतेच्या सुरक्षेची काळजी करणारे ग्रामीण पत्रकार स्वतःच असुरक्षिततेच्या छायेत जगत आहेत, त्याचे वाईट वाटते.

– अख्खं आयुष्य समाजहितासाठी संघर्ष करणाऱ्या ग्रामीण पत्रकारांना स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही न्याय मिळत नाही, त्याचे वाईट वाटते.

– एकीकडे सर्वसामान्य नागरीकांवर वेळोवेळी होत असलेला अन्याय आणि सामाजिक बांधिलकी पत्रकारीता सोडू देत नाही, तर दुसरीकडे कुठलीच मदत नसल्याने ग्रामीण पत्रकार उद्धवस्त होत चालले आहेत, त्याचे वाईट वाटते.

– असंख्य चांगल्या पत्रकारांनी अनेक वर्षे पत्रकारीता करून नाईलाजाने पत्रकारीता सोडून दिली आहे आणि सोडत आहेत अर्थात ही धोक्याची घंटा आहे हे कोणाच्या लक्षात येऊ नये याचे वाईट वाटते.

– अशाच प्रकारे येणाऱ्या काळात चांगले ग्रामीण पत्रकार बाहेर पडत राहील्यास ग्रामीण जनतेला न्याय हक्क मिळवून देणार कोण ? त्याचे वाईट वाटते.

– पत्रकारांकडून अपेक्षा ठेवणारा समाज पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी कधीच रस्त्यावर उतरत नाही, त्याचे वाईट वाटते.

– ग्रामीण जनतेच्या न्याय हक्कासाठी पेटून उठणारा ग्रामीण पत्रकार स्वतःच्या न्याय हक्कासाठी पेटून उठत नाही, त्याचे वाईट वाटते.

– पत्रकारांसाठी लढणाऱ्या प्रत्येक संघटनेची दिशा वेगळी, मार्ग वेगळे, कार्यपद्धती वेगळी आणि विचारही वेगळे दिसुन येतात, त्याचे वाईट वाटते.

– सर्व पत्रकार संघटना समस्त पत्रकारांचे हित लक्षात घेवून एकत्रीत बसून सामंजस्याने चर्चा करीत नाहीत, सामुहीक प्रयत्न करीत नाहीत, त्याचे वाईट वाटते.

– विधानसभा असो किंवा विधानपरिषद समस्त पत्रकारांच्या प्रश्नांवर अपवादानेच चर्चा केली जाते, त्याचे वाईट वाटते.

– पत्रकारांसाठी एखादा निर्णय झालाच तर त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही, त्याचे वाईट वाटते.

– दुर्दैवाने विधानसभा अथवा विधानपरिषदेत ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नांवर स्वतंत्रपणे चर्चा करून निर्णय घेतले जात नाहीत, त्याचे वाईट वाटते.

– आयुष्यभर घर जाळून कोळशे करणाऱ्या असंख्य ग्रामीण पत्रकारांना आयुष्याच्या शेवटीही अडचणींचा सामना करावा लागतो, त्याचे वाईट वाटते.

– समाजाच्या न्याय हक्कासाठी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करणारा एखादा पत्रकार न्यायाच्या प्रतिक्षेत जगाचा निरोप घेतो, त्याचे वाईट वाटते.

  • ग्रामीण पत्रकार आयुष्यभर सर्वांसाठी संघर्ष करत जगतात आणि संघर्ष करत मरतात मात्र तरीही वर्तमानपत्र, शासन किंवा समाज त्याची दखल घेत नाही, त्याचे वाईट वाटते.

धन्यवाद…

.

Views: 615
Share

Related Posts

आधुनिक वाल्मिकी
संपादकीय

आधुनिक वाल्मिकी

October 1, 2021
लोकाभिमुख नेतृत्व, लोकनेते मोहनराव (काका) भोसले यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
संपादकीय

लोकाभिमुख नेतृत्व, लोकनेते मोहनराव (काका) भोसले यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

July 10, 2021
उपविभागीय शाखा अभियंता व्ही.एम. मोरे साहेब सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याबद्दल मला आलेला अनुभव. – पत्रकार – सदाशिव पुकळे
संपादकीय

उपविभागीय शाखा अभियंता व्ही.एम. मोरे साहेब सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याबद्दल मला आलेला अनुभव. – पत्रकार – सदाशिव पुकळे

June 29, 2021
Next Post
वडूज येथे ५५ विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया पुर्व तपासणी संपन्न

वडूज येथे ५५ विद्यार्थ्यांची शस्त्रक्रिया पुर्व तपासणी संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आ. जयकुमार गोरे जिंकले ; ग्रीन कॉरिडॉर एमआयडिसी म्हसवडलाच………विधानभवनातील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब ; माण – खटाव तालुक्यात जल्लोष
  • सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र
  • फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित जाधव – माळी यांचा नाशिक मध्ये २६ मार्च रोजी होणार ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा .
  • सद्गुरु श्री श्री साखर कारखाना चेअरमन शेषागिरी राव अंकल यांनी अखंड बचेरीकरांचे मनं जिंकली…….सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने पाणी टंचाईच्या झळा सोसणा-या दुष्काळी बचेरी गावचा सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,,

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)