• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, March 26, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सामाजिक

वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाची भेट घालून देणारे एसटीचे कर्मचारीच- ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर

माणगंगा by माणगंगा
November 18, 2021
in सामाजिक
0
वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाची भेट घालून देणारे एसटीचे कर्मचारीच- ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर

वारकऱ्यांना पंढरीच्या विठ्ठलाची भेट घालून देणारे एसटीचे कर्मचारीच- ह-भ-प तुळशीदास महाराज देवकर

प्रतिनिधी / गंगाखेड


एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या विठ्ठलाची वारकर्‍यांना दर्शन रुपी भेट घालून देण्याच कार्य एसटीचे कर्मचारीच करतात. म्हणून तमाम वारकरी एसटी महामंडळाच्या आंदोलका सोबत आहोत असा विश्वास संत देवईमाय संस्थांनचे ह भ प तुळशीदास महाराज देवकर यांनी गंगाखेड येथे मंगलवारी एसटी कर्मचाऱ्यां समोर कीर्तनात बोलताना केलं.


एसटी महामंडळ चे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी गंगाखेड एसटी आगार समोर कर्मचारी आंदोलनास बसले आहेत. महाराष्ट्रात 35 च्या वर कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असताना त्या मृत कर्मचाऱ्यांच्या आत्म्याला शांती लाभावी व इतर कर्मचारी आत्महत्येसारख्या वाईट विचारापासून दूर राहावेत यासाठी किर्तन सोहळ्याचे संयोजक, तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या संकल्पनेतून गुरूवारी कीर्तन सोहळा पार पडला. यावेळी संत तुळशीदास महाराज देवकर बोलत होते. एसटी कर्मचारी हे जनतेच्या दृष्टीने सर्वात विश्वासू कर्मचारी असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवूनच बसमध्ये बसताना प्रवासी निवांत आणि सुखी प्रवास करू शकतो.

टपाल पाठवताना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याकडे टपाल दिल्यानंतर आपण निवांत होतो. हे या कर्मचाऱ्यावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे .वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन घडवून आणणारे कर्मचारी आज संकटात असताना आम्ही वारकर्‍यांनी या कर्मचाऱ्यांना साथ देणे गरजेचे आहे.

यासाठी परिसरातील भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित असल्याचं महाराजांनी आपल्या कीर्तनात सांगितले. यावेळी कीर्तनकार तुळशीदास महाराज यांचा सत्कार संत मोतीराम महाराज गोशाळेचे संचालक तथा किर्तन सोहळ्याचे संयोजक सखाराम बोबडे पडेगावकर यांनी सत्कार केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल माजी सरपंच नारायणराव धनवटे, सोपानराव टोले, जयदेव मिसे, जयवंत कुंडगिर, मुंजाभाऊ लांडे, राम भोळे, रामेश्वर बचाटे ,कारभारी नीरस, गणेश टाक , विजयआप्पा खाकरे ,ह भ प शिवाजी महाराज बोबडे , प्रताप कुळकर्णी आदींचा महाराजांनी विशेष सत्कार केला. निखिल आया , बंडूसेठ कात्रे यांनी किर्तन स्थळी फराळाची व्यवस्था केली होती. ह-भ-प बर्वे महाराज, गोविंद मुंडे, ह भ प प्रभाकर महाराज बचाटे, नंदकुमार सिसोदिया ,किशन भंडारे ,गजानन पारवे आदीसह यावेळी एस टी महामंडळाचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय इतर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी कार्यक्रम स्थळ येऊन पाहणी केली.

सदाभाऊ खोत यांचे कडून आंदोलनकर्त्यांचे कौतुक

मागील दहा दिवसांपासून मुंबईत आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलनात लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत सहभागी सहभागी आहेत. गंगाखेड येथे आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी कीर्तन सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल संयोजक व एसटी कर्मचाऱ्यांचे सदाभाऊ खोत यांनी स्वतः फोन करून अभिनंदन केले व आपला पाठिंबा व्यक्त केला. सदाभाऊ खोत यांचा किर्तन सुरू असतानाच संयोजक सखाराम बोबडे पडेगावकऱ् यांच्या नंबर वर कॉल आला. फोन वरील संभाषण लाऊडस्पीकर द्वारे उपस्थित आंदोलकांनी ऐकले. एसटी कर्मचाऱ्यांनो घाबरू नका .आम्ही आपल्या सोबत आहोत. निलंबनाच्या नोटीसा कितीही निघतील. सरकारचे श्राद्ध घालूनच ही लढाई थांबेल असा विश्वास सदाभाऊंनी मोबाईलवर बोलताना व्यक्त केला.सदाभाऊ खोत यांच्या मोबाईल वरील भाषणांना उपस्थित आंदोलनकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

Views: 594
Share

Related Posts

रक्षाबंधनाचे महत्व :-
सामाजिक

रक्षाबंधनाचे महत्व :-

August 22, 2021
होलार समाजाचे स्वतंत्र महामंडळ निर्माण करावे ! दयानंद ऐवळे
सामाजिक

होलार समाजाचे स्वतंत्र महामंडळ निर्माण करावे ! दयानंद ऐवळे

August 7, 2021
अहमदपूरकरांनी केले वसंतराव नाईक यांना क्रतीशील अभिवादन.
सामाजिक

अहमदपूरकरांनी केले वसंतराव नाईक यांना क्रतीशील अभिवादन.

July 30, 2021
कराड तालुक्यातील उंब्रजमध्ये “घरोघरी शाळा” उपक्रमाची सुरुवात.  विद्यार्थ्यांच्या घरातच सुरू झाल्या शाळा.
सामाजिक

कराड तालुक्यातील उंब्रजमध्ये “घरोघरी शाळा” उपक्रमाची सुरुवात. विद्यार्थ्यांच्या घरातच सुरू झाल्या शाळा.

July 29, 2021
माण तालुक्यत जि. प. शाळा घरोघरी शाळा उपक्रम सुरू……
सामाजिक

माण तालुक्यत जि. प. शाळा घरोघरी शाळा उपक्रम सुरू……

July 29, 2021
समाजाच्या विकासासाठी शिक्षण ,आर्थिक सुबत्ता व समाजनिष्ठता हे तीन मूलमंत्र डॉ. जयाजीनाथ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष
सामाजिक

समाजाच्या विकासासाठी शिक्षण ,आर्थिक सुबत्ता व समाजनिष्ठता हे तीन मूलमंत्र डॉ. जयाजीनाथ राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष

July 28, 2021
Next Post
राजे प्रतिष्ठानच्या दहिवडी शहराध्यक्ष पदी पै.अक्षय तुपे …..

राजे प्रतिष्ठानच्या दहिवडी शहराध्यक्ष पदी पै.अक्षय तुपे .....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आ. जयकुमार गोरे जिंकले ; ग्रीन कॉरिडॉर एमआयडिसी म्हसवडलाच………विधानभवनातील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब ; माण – खटाव तालुक्यात जल्लोष
  • सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र
  • फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित जाधव – माळी यांचा नाशिक मध्ये २६ मार्च रोजी होणार ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा .
  • सद्गुरु श्री श्री साखर कारखाना चेअरमन शेषागिरी राव अंकल यांनी अखंड बचेरीकरांचे मनं जिंकली…….सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने पाणी टंचाईच्या झळा सोसणा-या दुष्काळी बचेरी गावचा सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,,

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)