विषयाची मराठी वेब सिरीजची निर्मिती
माणगंगा न्यूज पोर्टल कवठेमहांकाळ:-खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली
प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सामाजिक बेड्या तोडून बेधुंद राहायला आवडते एकीकडे कौटुंबिक संस्कार तर दुसरीकडे मैत्री प्रेम याचा ताळमेळ साधत असताना मनाची होणारी घुसमट बरंच काही शिकवून जाते.प्रत्येकजण आयुष्यात एखादा तरी प्रेमात पडतो कुणाची कथा पूर्ण होते तर कुणाची अपूर्णच राहते.
अशा काही आशय व विषयाची मराठी वेब सिरीजची निर्मिती निर्माता/दिग्दर्शक – मदन दीपक जावीर सहनिर्माता-संजय हुलेनवार उदघाटन सिध्दनाथ देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मा.चंद्रकांत दौलत पुजारी उपस्थित अर्जुन पुजारी मधुकर पाटोळे दिनकर जावीर सुभाष केंगार सदानंद कांबळे रविकिरण जावीर अभिजित पुजारी बाळासाहेब सुतार उपस्थित होते वेब सिरीज चे नावच बेधुंद असे ठेवण्यात आले आहे. ही वेबसिरीज लवकरच मदन दीपक जावीर यांच्या नाथ प्रॉडक्शन या यूट्यूब चैनल वर प्रदर्शित होणार आहे…
या वेब सिरीज चे प्रमुख लेखन-दिग्दर्शन विक्रम शिवाजी बल्लाळ यांनी केले आहे तर छायाचित्रण अमर ढाणे व किरण काळे यांनी केले आहे. वेब सिरीज मध्ये ओम पानस्कर, आदिती देवर्षी, अभिजीत सकटे,संजना देशमुख, प्रियाल राक्षे,कुमुदिनी आदाते, शफिक मोमीन, धनंजय घाडगे सुजाता पाटील सचिन डोंबाळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
वेब सिरीज लवकरच नाथ प्रॉडक्शन या युट्युब चॅनेल
प्रदर्शित होणार आहे. हि वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी सर्व कलाकारांना आशा आहे.
नुकतेच या वेबसेरीज चे चित्रिकरण खरसुंडी व परिसरात पार पडले…! वेब सिरीज विषयी बोलताना निर्माता मदन जावीर म्हणाले की प्रेक्षकांना नवीन काहीतरी व दर्जेदार देण्याचा आमचा प्रयत्न असेल.हा प्रयत्न यशस्वी होण्यासाठी तुम्हा सर्व प्रेक्षकांची आवश्यकता आहे.