शेटफळेत वजनापेक्षा जास्त अन्न खाणारी कोंबडी.
वजनापेक्षा जास्त अन्न खाऊन कोंबडीने खाद्य खाण्याचा विक्रम मोडला
शेटफळे ता आटपाडी येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक पवार यांच्या पोल्ट्री फार्म वर जगण्यापेक्षा जास्त म्हणजे कोंबडीच्या वजनापेक्षा जास्त अन्न खाणारी कोंबडी आहे या खादाड्या कोंबडी बाबत सध्या चर्चेचा विषय बनला आहे
अन्न खावं असं म्हटलं जातं मात्र ही कोंबडी जणूकाही खाण्यासाठीच जगत आहे असं दिसत आहे.
शेटफळे ता आटपाडी येथील आशोक पवार यांच्या पोल्ट्री फार्म मधील बॉयलर जातीची कोंबडी आहे. आज या कोंबडीचे वय 76 दिवसाचा आहे. ही कोंबडी दररोज किमान अर्धा किलो हून जास्त खाद्य खाते म्हणजे जवळपास दहा कोंबड्यांचे खाद्य ही कोंबडी एकटीच खात आहे.
तिला चालताना तिने खाल्लेल्या खाद्याच्या वजनामुळे नीट चालता सुद्धा येत नाही तरीसुद्धा ही कोंबडी दिवसभर खाद्य खाण्यातच व्यस्त असते. आता आपल्या क्षमतेपेक्षा जास्त अन्न खाणे ही कोंबडी विश्वविक्रम तर करणार नाही ना असं वाटायला लागलंय…..