योग्य नेतृत्वाची पाठराखण करण्याची परंपरा गिरिजाशंकरवाडीने राखली – माजी आमदार प्रभाकर घार्गे
सोसायटीच्या नूतन सदस्यांचा सत्कार
मायणी :- प्रतिनिधी
गिरिजाशंकरवाडी या गावाने सदैव स्व.केशवराव पाटील यांच्या विचारांची पाठराखण केली आहे.सहकारामध्ये केलेले काम आणि या गावाशी असलेल आपलं नात यामुळे एखादा अपवाद वगळता संपूर्ण गावाने आपल्या विचाराशी एकमताने उभे राहून सोसायटी निकालाच्या निम्मिताने जनतेने आपल्यावरील विश्वास दाखवून देऊन तालुक्याच्या सहकारात सर्वाधिक कार्य करणाऱ्या योग्य नेतृत्वाची पाठराखण करण्याची परंपरा या गावाने राखली असल्याचा विश्वास माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांनी ते गिरीजाशंकरवाडी येथील सोसायटीमध्ये विजयी झालेल्या नूतन निर्वाचित सदस्यांचा सत्कार व अभिनंदन कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमास माजी उपसभापती चंद्रकांत पाटील,अनिल माने,बापूराव थोरवे,आशुतोष माने,सरपंच सुमन थोरवे,भानुदास थोरवे,विलास थोरवे,भीमराव थोरवे,बबन थोरवे यांची प्रमुख उपस्थिती होते.
यावेळी गिरीजाशंकरवाडी स्व.आमदार केशवराव पाटील यांना मानणारे गाव होते.या गावास १९७२ साली रास्ता,लाईट,पाण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली होती. प्रथमच झालेल्या निवडणुकीत मतदारांनी प्रभाकर घार्गे यांच्यावर विशास ठेऊन सत्तांतर घडवून आणलं.चुकीच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध गावाने कौल देऊन विरोधकांचा दारुण पराभव केला असल्याचा घणाघात बापूराव थोरवे यांनी विरोधकांवर केला.
चौकट :- खटाव तालुक्यातील सर्वाधिक सोसायट्या आपल्या विचाराच्या
केशवराव पाटील यांनी जिल्हा बँकेत ३० वर्ष संचालक निवड होऊन त्यांनी बँकेचे अध्यक्षपदही भूषवले होते. मीही गेल्या २० वर्ष बँकेचा संचालक म्हणून कार्यरत असून गेली पन्नास वर्ष सहकारात केलेल्या कामामुळे तालुक्यातील सोसायट्या व शेतकऱ्यांनी सहकारात निस्वार्थ काम करणाऱ्या नेतृत्वासाठी स्वतः पेटून उठुन सोसायट्या निवडणुकीत यश मिळवण्याचा उच्चांक गाठला असून खटाव तालुक्यातील सर्वाधिक सोसायट्या आपल्या विचाराच्या निवडून आल्या आहेत. – प्रभाकर घार्गे,मा.आमदार,जिल्हा बँक संचालक.







