वरकुटे येथील दोघा तरुणांचा अपघाती मृत्यू
चिकमहूद ते दिघंची मार्गावरील हॉटेल विशाल जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला आहे. अपघातातील मयत तरुण वरकुटे-मलवडी(ता.माण, जि.सातारा)येथील आहे.

आज रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चिकमहूद(ता.सांगोला) ते दिघंची(जि.सांगली)मार्गावर चिकमहूद शिवारातील हॉटेल विशाल जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.या अपघातात सुशांत शांताराम जाधव(वय 28,रा.वरकुटे-मलवडी ता. माण, जि.सातारा) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या सोबत असणारा मंगेश शिवाजी पिसे(वय 28,रा.वरकुटे-मलवडी,ता. माण,जि.सातारा)हा गंभीर जखमी झाला आहे.वरकुटे- मलवडी येथील हे दोघेजण त्यांच्याकडील दुचाकी क्रमांक एम.एच.11,बी.पी. 0839 या दुचाकीवरून दिघंची मार्गे महूद कडे येत होते.तर अज्ञात वाहन चिकमहूद हून दिघांची कडे निघाले होते. या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील एक जण जागीच मयत झाला तर दुसरा गंभीर जखमी झालेला आहे.


यावेळी सागर जावीर,वैभव वाघमारे यांच्यासह उपस्थित नागरिकांनी तात्काळ 108 या क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेला बोलावून घेतले. जखमी मंगेश पैसे यास रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सांगोला कडे पाठविण्यात आल अज्ञात वाहन मोटारसायकल स्वारांच्या अंगावरून व डोक्यावरून गेल्याने सर्वत्र मांस व रक्ताचा सडा पडलेला होता.
चौकट-
ब्लॅक स्पॉट व वारंवार अपघात
पंढरपूर-मल्हारपेठ मार्गावरील चिकमहूद(ता. सांगोला) शिवारात येथे वळणावळणाचा धोकादायक रस्ता आहे. येथे यापूर्वीही अनेक वेळा अपघात होऊन अनेकांचा बळी गेलेला आहे.हा ब्लॅक स्पाॅट दुरुस्त करण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.








