मेरी माता हायस्कूल म्हसवड ने जपली शंभर टक्के यशाची परंपरा कायम
एसएससी परीक्षेत आर्या आंबले ने पटकावला प्रथम क्रमांक.
नरवणे( प्रतिनिधी.)
अशोक हांडे
नुकत्याच जाहीर झालेल्या एस.एस.सी. परीक्षेच्या निकालामध्ये आर्या अण्णासाहेब आंबले हिने 96.40 %गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. मेरी माता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज म्हसवड या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने याही वर्षी शंभर टक्के यशाची परंपरा कायम ठेवत एकूण 31 विद्यार्थ्यांपैकी 20 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये पास झाले असून द्वितीय क्रमांक थावरे श्रावणी नामदेव 94.20 %,तृतीय क्रमांक कोकरे स्नेहा तुकाराम 92.20% असा आहे.
या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक केला आहे अशी चर्चा परिसरातून व्यक्त होत आहे. गेली दोन वर्ष कोरोना सारख्या प्रतिकूल परिस्थितीतून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची होत असणारी दशा, ऑनलाइन शिक्षण, बदललेल्या मानसिक परिस्थिती मधून या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करत भरघोस यश संपादन केल्याने हा निकाल इतर सर्व वर्षांच्या निकाल यापेक्षा वेगळा आहे अशी चर्चा परिसरातून होताना दिसते .
शिक्षकांच्या मिळेल त्या मार्गदर्शनावर आणि वेळापत्रकानुसार स्वयं अध्ययन करून सर्व समस्यांमधून वाट काढत यश संपादन केले आहे त्यामुळे प्रिन्सिपल फादर जॉमी, फादर फ्रान्सिस आणि फादर बॉबीन तसेच फादर रॉबिन, वर्गशिक्षक जवळ कोटी मॅडम यांच्याकडून विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप मिळत आहे. शाळा व्यवस्थापनाकडून पालकांकडून आणि परिसरातून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.







