शिवसेना शिंदे गटाचे चाळीसगाव शहरप्रमुख पदी सागर चौधरी यांची निवड…
वाघुळ – प्रविण अहिरे
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना नेते उमेश गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांच्या हस्ते चाळीसगांव शहर प्रमुखपदी सागर रावण चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सागर चौधरी हे शिवसेना पक्षाचे 2014 पासून ते आजपर्यंत एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत.तसेच स्वर्गीय पप्पूदादा गुंजाळ यांचे खंदे समर्थक म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. सामाजिक, राजकीय,शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असून तालुक्यात शिवसेना पक्ष बांधणीसाठी देखील आहे मोलाचा वाटा असल्याचे सांगितले जात आहे पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे फळ शिवसेना शिंदे गट जळगाव जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील यांनी सागर चौधरी यांची चाळीसगाव शिवसेना शहरप्रमुख पदी वर्णी लावून दिले आहे.
जळगाव जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील व चाळीसगाव तालुका प्रमुख राहुल पाटील व शुभम राठोड यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले आहेत. पक्ष आणि जिल्हाप्रमुखांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलवून त्यांचा विश्वास नक्कीच सार्थकी लावील.त्याचबरोबर पक्ष वाढीबरोबरच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या माध्यमातून सोडवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया सागर चौधरी यांनी निवडीनंतर दिली.
तसेच त्यांच्या शहरप्रमुख निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदनांचा वर्षाव सुरू आहे.