मायणीत नवरात्रौत्सवास जल्लोषात सुरुवात
सोमवारी विनायक मंडळाकडून मराठी वकृत्व स्पर्धा
मायणी:- प्रतिनिधी
मायणी ता. खटाव येथे नवरात्रीनिमित्त दुर्गा मातांचे हलगी पथक ,बँड पथक ,अश्वपथक, विद्युत बाळग्या विविध वेषातील बालमूंचे पथके व ट्रॅक्टर भोवती केलेली आकर्षक विद्युत रोषणाईत उत्साहात आगमन झाले. यावर्षी मायणी नगरीची पहाट दुर्गादौडने सुरू होत आहे. भवानी मंदिरापासून रोज सुरवात होणाऱ्या या दुर्गादौड मध्ये ग्रामस्थ, तरुणवर्ग ,बालके,महीला यांचा मोठा सहभाग असतो. रोज एक मंडळात आरती होऊन चांदणी चौक येथील भगव्या ध्वजपाशी या दौडीची सांगता होते.
यंदा गावातील अनेक मंडळात विविध धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
विनायक कडून वकृत्व स्पर्धा,रक्तदान शिबिर
चांदणी चौकातील कोरोना काळात अनेकांची भूक भागविणाऱ्या आणि अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या विनायक दुर्गामाता उत्सव व सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने काल शुक्रवारी दुर्गा सप्तशती कुंकू मार्चन हा महिलांचा कार्यक्रम,काल शनिवारी ५ ऑक्टो रोजी चांडाळ चौकटी फेम ह.भ.प. भरत शिंदे यांचा सुश्राव्य कीर्तन कार्यक्रम संपन्न झाला. आज रविवार ६ ऑक्टों. रोजी वेशभूषा कार्यक्रम आहे.
तर सोमवार दि. ०७ ऑक्टों. रोजी भव्य मराठी वकृत्व स्पर्धा महाविद्यालयीन गट व शालेय गट अशा दोन गटात पार पडणार आहेत. यातील स्पर्धकांना बक्षीस म्हणून रोख रक्कम,शिल्ड आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर मंगळवारी महिला भगिनींना हळदी कुंकुवाचा कार्यक्रम ,बुधवारी मंडळ व आयुष ब्लडबँक वडूज यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे. गुरुवार देवीचा जागरण गोंधळ तर शुक्रवारी महाप्रसाद व शनिवारी भव्यदिव्य अशी देवीची विसर्जन मिरवणूक पार पडणार आहे. मंडळाच्या वतीने सचिन घाडगे,मंगेश गायकवाड,अमित माने,विजय भोंगाळे, अविनाश दगडे,सचिन माने,सुनील भोंगाळे,अक्षय दगडे,स्वप्नील भोंगाळे,महेश भोंगाळे,अजय दगडे,खंडू लोहार, विजय घाडगे, अनिकेत भोंगाळे,गणेश वाघ,हर्षवर्धन घाडगे,दर्शन गायकवाड ,रोहित माने, अभयदेव नायर हे या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत
चौकट –
हिंदू धर्मातील पवित्र सण म्हणजे नवरात्रोत्सव.दुर्गामातेने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध करून त्याचा वध करून समस्त सृष्टीला त्याच्या जाचातून मुक्त केलं होत. हिंदू संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आम्ही दुर्गादौड मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते.या आवाहनास मायणी नगरीतील युवक,महिलावर्ग यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. याचे समाधान वाटते – विजय वरुडे,दुर्गादौड समिती.मायणी.