श्री सुनील भगवंतराव टोके, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार व व्यकत केली आपली व्यथा/तक्रार !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
श्री.दिलीप वळसे पाटील. मा.गृह मंत्री.महाराष्ट्र राज्य, मुंबई.
श्री.हेमंत जी नगराळे.मा.पोलीस आयुक्त बृहन्मुंबई पोलीस दल मुंबई
महोदय
व्ही. पी रोड पोलीस ठाणे मुंबई या पोलीस ठाण्याच्या मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तेथिल काही ठराविक पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या कृपेने स्वरूप डान्सबार मालक व चालक यांच्या आर्थिक दुकानदारी कारभाराचे तसेच मे. सर्वोच्च न्यायालयाच्या आणि मे.उच्च न्यायालयाने दिलेल्या सक्त आदेशांचे पालन होत नसले बाबत मी गेल्या वर्षी दिनांक 24/02/2020 रोजी मा.वपोनी गुलाबराव मोरे व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त नागेश संभाजी जाधव (सद्या दोघेही सेवानिवृत्त) यांच्या आशीर्वादाने वरील नमूद स्वरूप डान्सबार मधील बेकायदेशीर डान्स,पैशाची उधळण, अमर्याद वेळेस डान्सबार चालू असल्या बाबत व्हिडीओ cd सह लेखी तक्रार केलेल्या होत्या विशेषतः कोरोना महामारी काळात लॉक डाऊन असताना हे सर्व बेकायदेशीर कृत्य नमूद पोलीस अधिकारी यांच्या संमतीने खुले आम सुरू होते.
प्रदीर्घ काळ होऊन ही माझ्या लेखी अर्जावर आज तागायत योग्य कारवाई झालेली नाही या सर्व गंभीर प्रकरणांत फक्त एक लेखी जबाबात घेण्यात आलेला असून त्या मध्ये मी वरील नमूद पोलीस अधिकारी तसेच त्या दिवशी रात्रपाळी कर्तव्य बजावणीस असलेले रात्रपाळी पोलीस निरीक्षक, परी मंडळ 2 चे मा.पोलीस उप आयुक्त श्री.राजीव जैन तसेच तेथिल दक्षिण प्रादेशिक विभाग मा.अपर पोलीस आयुक्त यांच्या बेफिकर कारभार, बेकायदेशीर कामात सदर पोलीस अधिकारी यांना मदत केल्या बाबत मत व्यक्त केलेले होते कारण या सर्वांनी जाणीवपूर्वक एक मेकांना वाचवण्यासाठी त्यांना प्राप्त असलेल्या वरिष्ठ पदांचा जाणीवपूर्वक गैरवापर करून संगनमताने बेकायदेशीर कार्यप्रणालीचा वापर करून स्वतःचे अपयश व आर्थिक व्यवहार संभाळून स्वकर्तुत्वाने पोलीस दलाची प्रतिमा मलिन केलेली आहे.
आता नव्याने पुन्हा तोच बेकायदेशीर प्रकार मा.न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे,निकालांचे योग्य पालन न करता नवनियुक्त मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही पी रोड पोलीस ठाणे मुंबई यांनी आर्थिक गणिते जुळवून आपल्या सर्वांची नव्याने दिशाभूल करून स्वतःच्या आर्थिक फायद्या करता स्वरूप डान्सबार चालक मालक यांना बेकायदेशीर मदत करून पुन्हा नव्याने पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याचे सत्कर्म केलं आणि हे सर्व खरंतर महाराष्ट्र राज्य शासनातील मा.लोकप्रतिनिधी यांच्या आशीर्वादाने मा. वपोनी यांनी केलेले आहे हे माझं ठाम मत आहे.
कारण सेवनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना तेथील सद्याच्या मा.वपोनी इतकं मोठं धाडस करणार नाहीत शिवाय कोरोना महामारी संकटात शासनाने घालून दिलेल्या सक्त नियमांच्या विरोधात उभे राहणे मे सर्वोच्च न्यायालय व मे उच्च न्यायालयाने दिलेले न्याय निर्देश, आदेश, पायदळी तुडवण्याची हिंमत ठेवणे हे ही मोठं आव्हान त्यांनी स्वीकारले नसते.सदर स्वरूप डान्सबार प्रकरणांत मी केलेल्या तक्रारी बाबत ते स्वतः इतके बेफिकर रहातील हे ही मनाला न पटणार आहे पण आता ते मान्य करावे लागेल पटवून घ्यावेच लागेल कारण सदर बार वर कारवाई स्वतः मा.अपर पोलीस आयुक्त श्री.दिलीप शिंदे व त्यांच्या पथकाकडून करण्यात आलेली आहे अशी कारवाई करताना त्या बार मध्ये 11 नर्तकी सापडल्या व 17 ग्राहक यांचेवर कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे या कारवाईतील मा.वरिष्ठ व त्यांचे सहकारी यांचे प्रथम आभार व अभिनंदन मी सुनील भगवंतराव टोके सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई नक्कीच करत आहे.
स्वरूप डान्सबार हा ज्यांच्या आशीर्वादाने चालू त्यावेळी व आता आहे त्या जबाबदार पोलीस अधिकारी यांचेवर योग्य कायदेशीर कारवाई बाबत मी सतत पाठ पुरावा तर करणारच आहे कारण या प्रकरणातील सर्वात पहिला मी लेखी व पुराव्यां सह तक्रारदार आहे राहिला योग्य कारवाईचा तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की माझ्या तक्रार अर्जावर योग्य कारवाई करण्यात आलेली नाही ती मे उच्च न्यायालयाच्या माध्यमातून व लाच लुचपत विभागात तक्रार करून न्याय मिळवण्यासाठी मी तजवीज सुरू केलेली आहेच यात कोणाची वयक्तिक, व्यतिगत बदनामी करण्याचा हेतू आमचा नाही मात्र सर्वाना कायदा नियम सारखे असावेत जे मे न्याय व्यवस्था, जनता यांना अभिप्रेत आहेत. जय हिंद !!
श्री सुनिल टाेके याच्या मताशी श्री जगदीश काशीकर सहमत आहेत कारण तेही अशा अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी – पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीबाबत !! काेमल रहिवाशीची व आपली समस्या महाराष्ट्र सरकारचे पोर्टल “आपले सरकार” यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” हा फेसबुक ग्रुप
(https://www.facebook.com/groups/485736278978687/)
त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत व ऊदया काेमल रहीवाशी साेसायटीमध्ये काही दुर्घटना घडल्यास साेसायटीच्या आजी व माजी कमीटी सदस्य तसेच सभासदांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये हे ठरविण्याची वेळ आली आहे !! कालच त्यानी या संदर्भात आपली समस्या भारतीय जनता पार्टीचे नेते व अध्यक्श श्री चंद्रकातदादा पाटील यांना मुंबई येथील नरीमन पॉईन्ट येथील कार्यालयात भेटुन आपली समस्या सांगितली.