मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतुन गरीब आणि गरजु रुग्णास आर्थिक मदत
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
जालना: जालना येथील श्री किसन माधवराव लोहाटे या पेशंटला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 1 लाख रुपयांची उपचारासाठी मदत मिळवून देण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री मा श्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री सहायत्ता कक्षाचे कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे, शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर, युवा सेना कार्यकारनी सदस्य अभिमन्यु खोतकर, जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या माध्यमातून व टिंकु पाटील जिगे व संभाजी भालशंकर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा समन्वयक यांच्या पाठपुराव्यामुळे अवघ्या 5 दिवसांत पेशंटला आर्थिक मदत भेटली त्यामुळे लोहटे कुटुंबिय तसेच त्यांच्या ईतर नातेवाईकांनी मा श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा श्री मंगेश चिवटे, शिवसेना शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर तसेच ईतरांचे आभार मानले.
मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे !!