सावित्रीबाई फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठान पुणे , तक्षशिला बुध्द विहार,
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले
व राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती महोत्सव
पुणे ;
नागपुर चाळ येरवडा पुणे येथील महिलां साठी गेले आठ दिवस कार्यक्रम आयोजित केला होता.३जाने. रोजी कार्यक्रमाचे नगरसेवक डॉ सिध्दार्थ धेंडे कार्यक्रमाचे उदघाटन केले .व शुभेच्छा दिल्या.महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.दुसया दिवशी मी सावित्रीबाई फुले बोलते .या विषयी महानंदा ताई डाळिंबे यांनी एकांकिका सादर केली.
तिसऱ्या दिवशी संविधान माहीती व कायद्याची माहिती यां वर सुधाकर सरदार त्यांनी मार्गदर्शन केले.तसेच बार्टी समतादुत प्रकल्प अधिकारी शितल ताई बंडगर यांनी महिलांशी संवाद साधुन मार्गदर्शन केले.
चौथ्या दिवशी उद्योजकता विकास यांवर मार्गदर्शन खादी ग्रामोद्योग कस्तुरबा गांधी विद्यालय पुणे घ्या प्रिन्सिपॉल मृदुला ताई जक्कल यांनी केले.व ललिता महाजन यांनी अत्तर कसे बनवतात हे करून दाखवले.
पाचव्या दिवशी आजचा युवक कसा असावा यां वर संस्थेच्या अध्यक्षा व सचिव यांनी मार्गदर्शन केले तसेच महिलांनी ही या विषयावर आपले विचार मांडले.तसेच बार्टी च्या किर्ती आखाडे यांनी मार्गदर्शन केले
सहाव्या दिवशी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती १० महिलांनी सहभाग घेतला होता. प्राध्यापक श्री मनोज गायकवाड यांनी परीक्षक म्हणून उपस्थित होते. व महिलांचे कौतुक केले व मार्गदर्शन केले.
सातव्या दिवशी सकस आहार यां विषयी वेलनेस कोच वैशाली ताई गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
आठव्या दिवशी पाककला स्पर्धा आयोजित केली होती
१२ महिलांनी सहभाग घेतला होता.परीक्षक वैशाली गायकवाड होत्या.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री योगेश कोंढाळकर उपस्थित होते.त्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. सुनंदा निकाळजे आशा अल्हाट,अनिता घाडगे, शोभा कांबळे,व सुनंदा कांबळे,रफिना शेख,रज्जो कांबळे,माया भरणे,
महिलांना मार्गदर्शन करुन.संस्थेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आभार संस्थेच्या अध्यक्षा नी मानले.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थापिका उज्वला गायकवाड,सचिव कविता घाडगे, किर्ती आखाडे यांनी केले
,