बोपगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न
पुणे विभागीय प्रतिनिधी – अॅड . दत्ताञय फडतरे
पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील बोपगाव येथे 74 व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला . शौर्य , त्याग बलिदान आणि स्वातंञ्याचे प्रतिक असणार्या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी ढोल- ताशे सनई दवारे प्रभातफेरीदवारे करण्यात आली .
गावातील चार ठिकाणी झेंडावंदन करण्यात आले. श्री सदगुरु कानिफनाथ माध्यमिक विद्यालयात डेक्कन – को -आॅपरेटीव्ह बँकेचे संचालक दयानंद फडतरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले . ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच शालन अर्जुन फडतरे , अंगणवाडी शाळा परिसरात विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन बापु अनंता फडतरे यांनी तिरंगा फडकाविला . जिल्हा परिषद शाळेत माजी सैनिक अरुण आबा फडतरे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली . ग्रामस्थांकडुन शालेय अभ्यासक्रमात तसेच क्रीडास्पर्धामध्ये विशेष कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षीस देवुन कौतुक करण्यात आले .
शेतकर्यांच्या पिकांना कमी बाजार मिळत असल्याने मुलांनी भाषणातुन आपल्या भावना व्यक्त केल्या . भारताचे संविधान म्हणजे काय याविषयी सांगण्याचा करत विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली . अंगणवाडीच्या शिक्षिका बागवान मॅडम यांनी लहान- मुलांना गीतांसाठी प्रोत्साहन दिले . यावेळी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले होते .ग्रामपंचायत सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुढाकार घेणार्या नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले .
यापुर्वी , शाळेच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन पाठपुरावा करत निधी मंजुर करुन आणल्याबददल योगेश नाना फडतरे यांना शाल , श्रीफळ देवुन सन्मानित करण्यात आले . .
जिल्हा परिषद शाळेच्या प्रागणांत पार पडलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद फडतरे , माजी सैनिक अरुण आबा फडतरे , ग्रामसेविका राखी ढगारे मॅडम , सरपंच , नवनियुक्त उपसरपंच हर्षदा पवार , सुषमा फडतरे , ज्योती फडतरे , सुवर्णा मधुकर जगदाळे , सारिका गुरव , स्वाती फडतरे , रामभाऊ फडतरे , तुकाराम शेठ फडतरे , साहेबराव जगदाळे , कानिफनाथ फडतरे , योगेश नाना फडतरे , अॅड .दत्ताञय फडतरे उपस्थित होते. पोलिस पाटील , विनायक गायकवाड यांनी ग्रामसुरक्षा दलात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी आवाहन केले. ग्रामस्थांनी स्वातंञ्य दिनाच्या कार्यक्रमात अधिकाअधिक संख्येने सहभागी होण्याबाबत अपेक्षा गायकवाड यांनी व्यक्त केली . विद्यार्थ्यांनी शाळांमधुन शिकत असताना मोठी स्वन्प पहा . सध्या जगत असलेल्या परिस्थितीचे भांडवल करु नका ,
शिक्षणाने कोणतीही मोठी पार्श्वभुमी नसताना मोठ्या पदापर्यंत जाता येत , आज परिस्थिती कोणतीही असु द्या , ती बदलण्याची मानसिकता ठेवा .जीवनात यशस्वी होण्यासाठी साधेपणाने राहणार्या मोठ्या व्यक्तींची अनेक उदाहरणे सांगत उंच भरारी घेण्यासाठी प्रयन्तशील राहण्याची गरज अॅडव्हाकेट दत्ताञय फडतरे यांनी व्यक्त केली.
माध्यमिक विद्यालयाच्या वतीने बनकर सर , नेवसे सर , काकडे सर , पैठणकर मॅडम यांनी विशेष नियोजन केले तर मुख्याध्यापक झगडे सर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकांनी कार्यक्रम यशश्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करुन घेतली . यावेळी काळुनाना पवार , राम फडतरे , शामराव फडतरे , संभाजी वसंत फडतरे , गोरख नारायण फडतरे , अशोक फडतरे , सत्यवान फडतरे , महादेव फडतरे , शहाजी शिंदे , अमित जगदाळे , दादा जगदाळे , साहेबराव मारुती फडतरे , विश्वास रामचंद्र फडतरे , भीमाजी फडतरे , म्हस्कू फडतरे , बाळासाहेब रामचंद्र फडतरे , कुंडलिक फडतरे , श्रीपती कदम , योगेश राजेंद्र फडतरे , सोनबा फडतरे , राजेंद्र फडतरे , समाधान भोसले आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुञसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका आशा बोरकर मॅडम तसेच माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका शमिका गारडे मॅडम यांनी केले. .कार्यक्रमांचे अध्यक्षांनी शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या करत असलेल्या कामगिरीचे कौतुक केले . अनेक गोष्टींचा आढावा घेत समारोपाचे भाषण केले . उपस्थित ग्रामस्थांचे आभार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.