छत्रपती संभाजी महाराज साहित्य
संमेलन १२ मार्च रोजी सासवडला
दशरथ यादव यांची माहिती
सासवड, दि. ३० मराठी साहित्य संशोधन परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित राज्यस्तरीय १४ वे छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन दि. १२ मार्च २०२३ रोजी सासवड (ता. पुरंदर) येथे होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्यसंयोजक प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांनी सांगितली.
संमेलनाच्या संयोजन बैठकीला परिषदेचे राजाभाऊ जगताप, डॉ भालचंद्र सुपेकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्तानाना भोंगळे, श्यामकुमार मेमाणे, सुनील लोणकर, , नंदकुमार दिवसे, दत्ता कड, बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक सुनील धिवार, विजय तुपे, संतोष जवळकर, अमोल भोसले, संजय सोनवणे, दिपक पवार, सुरेश वाळेकर आदी उपस्थित होते.
क-हा काठावर दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात ग्रंथदिडी, उदघाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन व समारोप असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात महत्वपूर्ण भुमिका बजावलेल्या या परिसरात पुरंदर किल्ल्यावर संभाजीराजांचा जन्म झाला. सात गड आणि नऊ घाटांचा ही शंभर चौरस मैलाची क-हेपठारची दौलत आजही दिमाखात उभी आहे. संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिक संभाजीराजे यांचे काम समाजासमोर यावे, यातून युवकांना प्रेरणा मिळावी असा उद्देश ठेवूनच संमेलनाचे आयोजन केले जाते. संमेलनात सहभागी होणा-या कवी,लेखकांनी ९८८१०९८४८१ या क्र वरमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन राजाभाऊ जगताप यांनी केले आहे.
मा संपादक/पत्रकार
महोदय
आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध करावी ही विनंती
दशरथ यादव
मुख्य संयोजक
छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन