जेष्ठ नागरिक संघ, झरे ची एन. एस. एस. शिबिरास, विरळी येथे सदिच्छा भेट
महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे,पद्मभूषण डॉ. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी कला महाविद्यालय, झरे. या महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष 2022- 23 या वर्षाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष संस्कार शिबिर दिनांक 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 या कालावधीत होत असून दिनांक 28 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नागरिक संघ, झरे. यांनी या शिबिरास भेट दिली.
शिबिराच्या माध्यमातून मौजे विरळी या गावाचे काम झालेले आहे.त्या कामाची पाहणी केली. त्यानंतर पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून झालेल्या सीसीटीचे पुनर्बांधणीचे काम सुरू असणाऱ्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी बोलताना जवाहरलाल विद्यालय व कानिष्ठ महाविद्यालय, झरेचे माजी प्राचार्य, मा. श्री. एस.बी.माने म्हणाले की चार भिंतीतील शिक्षणापेक्षा चार भिंतीच्या बाहेरील शिक्षण महत्त्वाचा आहे. आपण या शिबिराच्या माध्यमातून स्वावलंबी शिक्षणाची अंमलबजावणी करीत आहात ते खरंच स्तुत्य काम आहे.
ज्यांना शिबिराला जायला संधी मिळते ते खरंच भाग्यवान असतात तुम्ही चांगलं काम आणि कामाबरोबर चांगले विचार परिसरात पोहोचवण्याचं खूप मोठं काम या शिबिराच्या माध्यमातून करत आहात.
त्यानंतर महाराणी देवी अहिल्याबाई एज्युकेशन सोसायटी सांगलीचे जेष्ठ सल्लागार मा
.एस. के.कदम बोलताना म्हणाले की आपल्या जीवनामध्ये देशाटन करणं खूप महत्त्वाचा आहे. माणसाला देवाने माणूस म्हणून जगण्याची संधी दिलेली आहे. त्या संधीच सोनं करायला पाहिजे.शिस्त आणि कष्ट सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. शिबिराच्या झालेल्या कामाविषयी जेष्ठ नागरिक संघाने समाधान व्यक्त केले. यावेळी नागरिक संघाचे, झरे गावचे लोकनियुक्त सरपंच,अंकुश पाटील,गणपती अर्जुन , माजी मुख्याध्यापक सी. बी.कारंडे, संस्थेचे खजिनदार, मा.एस. व्ही.अनुसे, नारायण भानुसे,रामचंद्र राऊत, किसन कुलकर्णी, दुर्योधन माने, किसन यादव, गजानन राजमाने, याबरोबर अनेक सदस्य उपस्थित होते.एन.एस.एस. स्वयं सेवकांसाठी जेष्ठ नागरिक संघ, झरे यांचेकडून द्राक्षे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.व्ही. ए.खिलारी यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डी. एस .देवकुळे यांनी तर आभार प्रा. एम. डी. खांडेकर यांनी मानले. यावेळी प्रा. एन. डी. पाटील, प्रा. एम.एस शिंगाडे, प्रा. आर. एच. चौगुले,प्रा. एस.डी. मुलाणी प्रा.श्रीमती माया घुटूकडे उपस्थित होते.