विभुतवाडीत जागतिक महिला दिन, व मॉडेल स्कूल आढावा बैठक संपन्न
आटपाडी प्रतिनिधी
विभूतवाडी ता. आटपाडी येथे जिल्हा परिषद शाळेत महिला दिन साजरा करण्यात आला तर महिला दिनाचे औचित्य साधून मॉडेल स्कूल अडीअडचणी जाणून घेण्यासाठीआढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीसाठी गट शिक्षण अधिकारी दत्तात्रय मोरे उपस्थित होते.
8 मार्च 2023 रोजी शाळेत महिला दिनाच्या दिवशी तालुका स्तरीय नियोजित मॉडेल स्कूल संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. सांगली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जितेंद्र डूडी यांच्या माझी शाळा आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) उपक्रमात दुसऱ्या टप्प्यात विभूतवाडी शाळेची निवड करण्यात आली आहे.
या संदर्भात शाळेत पूर्ण झालेली कामे व करावयाची कामे यांचा आढावा घेण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करताना शिक्षक गणेश नेहरकर यांनी उपस्थितांना मॉडेल स्कूल उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच पहिल्या टप्प्यातील मॉडेल स्कूल असणाऱ्या शाळांमध्ये निर्माण झालेल्या सुविधांबद्दल माहिती दिली.
ग्रामीण भागातील मुलांनाही शहरातील मुलांप्रमाणे सुविधांनी युक्त शाळा व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला असल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे यांनी उपस्थित पालक,गावकरी,महिला वर्गास शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा व लोकवर्गणीतून करावयाच्या सुविधांबद्दल माहिती दिली.
या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपली शाळा उत्कृष्ट बनवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. तसेच होणाऱ्या कामकाजाच्या दर्जा बाबत जागरूक असावे असे आवाहन ग्रामस्थांना केले.
या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे ,गणेश नेहरकर शाळेच्या मुख्याध्यापिका विमल केंद्रे शिक्षक निलेश महाजन, दिनेश वराट,माया मोटे, रूपाली मोटे, सरस्वती सकट, आरती सकट ,संगीत संगीता पावणे, सुरेखा सदिगले ,सिंधुबाई खरजे ,शिलावती मोटे, अश्विनी वाघमोडे ,प्रियांका इनामदार, प्रियांका लोहार ,अश्विनी सकट ,स्नेहल पावणे, कविता खरजे, बायडाबाई सकट ,नमिता भिसे ,माया सूर्यकांत मोटे ,सोनाली सकट ,बुधावले.ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते.