कामथ येथे 1 जून जन्मतारीख असणाऱ्यांचा सामूहिक वाढदिवस उस्ताहात साजरा
कामथ ता. आटपाडी येथे दि.1जून2024सामूहिक वाढदिवस गावामध्ये हनुमान मंदिरासमोर सर्व ग्रामस्थांच्या उपस्तित मा. श्री. रविंद्र घुटूकडे कृषि सहाय्यक कामथ यांच्या संकल्पनेतून प्रती वर्षाप्रमाणे साजरा करण्यात आला.
या स्तुत्य कार्यक्रमामध्ये गावातील श्री.वाय. डी. सरक सर, श्री बापू मारुती गरदडे, श्री.नाना तातोबा अनुसे, श्री. टी. डी. सरक सर, श्री वसंत बापू सरक, श्री नाना विठोबा सरक, श्री आप्पा विठ्ठल कचरे, श्री शिवाजी विठोबा माने, श्री मारुती ज्ञानू सरक, श्री रामचंद्र आनंदा सरक व इतर ग्रामस्थांचा ( शेतकऱ्यांचा) सामूहिक वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जे दुसऱ्यासाठी जगतात ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात या स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आठवण आम्हास घुटूकडे साहेबांनी करून दिली. आम्ही सर्व कामथकर घुटूकडे साहेबांना त्यांच्या पन्नाशी पूर्ण वाढदिवशी हार्दिक शुभेच्छा देतो व त्यांचे भावी आयुष्य सुख-समृद्धीचे जावो ही सदिच्छाव्यक्त करतो.