आटपाडीत दैनिक केसरी चे तालुका प्रतिनिधी सदाशिव पुकळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान..
आटपाडी प्रतिनिधी
विभूतवाडी ता. आटपाडी गावचे सुपुत्र व दैनिक केसरीचे तालुका प्रतिनिधी सदाशिव पुकळे यांनी वर्षभरामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल दैनिक केसरीच्या संपादक व जाहिरात विभागाने सांगली येथील झालेल्या मीटिंगमध्ये पुकळे यांचा सन्मान करण्यात आला
दैनिक केसरी वृत्तपत्र समूहमार्फत सांगली येथे सदाशिव पुकळे यांचा सन्मान करण्यात आला होता. त्याचेच औचित्य साधून आज आटपाडीकरांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला,
याप्रसंगी ॲडवोकेट धनंजय पाटील, शहाजीबापू जाधव, शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष संजय कबीर, युवा सेना नेते मनोज नांगरे पाटील, विमा प्रतिनिधी शिवाजीराव चव्हाण पाटील, डॉ.बाळासाहेब माने दिघंची, युवा उद्योजक सुभाष चोपडे, दैनिक पुढारी पत्रकार शिवानंद शिरसागर ,दैनिक जनमतचे पत्रकार सुधीर पाटील ,योगेश पाटील उपस्थित होते