• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, March 26, 2023
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

इस्लामपुरचा जयंत दारिद्र निर्मूलन पॅटर्न महाराष्ट्रभर राबवा .

माणगंगा by माणगंगा
March 12, 2023
in सांगली
0
इस्लामपुरचा जयंत दारिद्र निर्मूलन पॅटर्न महाराष्ट्रभर राबवा .

इस्लामपुरचा जयंत दारिद्र निर्मूलन पॅटर्न महाराष्ट्रभर राबवा .


आटपाडी दि .१२ (प्रतिनिधी )


राष्ट्रवादी काँग्रेसला मजबुती देण्यासाठी सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करणारा इस्लामपुरचा जयंत दारिद्र निर्मूलन पॅटर्न राज्यभर राबवा. असे आवाहन सादिक खाटीक यांनी केले .


राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष संजयकुमार कोळी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदरावबापू पाटील, तालुका युवक चे अध्यक्ष सुरज पाटील, ओबीसी तालुका अध्यक्ष जालींदर कटरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी हे आवाहन केले .


प्रारंभी संजयकुमार कोळी यांचा सत्कार आनंदरावबापु पाटील यांच्या हस्ते करणेत आला तर विश्वजित सरगर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले .
ओबीसी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा आधार आहे . समाजातल्या सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन त्यांच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच अग्रेसर आहे . सांगली जिल्ह्यातील ओबीसी एनटी व्हीजेएनटी अल्पसंख्याक आणि सामाजीक न्याय विभागाला बरोबर घेऊन जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अभियान चालवणार आहोत .

आटपाडी तालुक्याच्या उपेक्षेबाबत राज्य स्तरावर आपण आवाज उठवत न्याय मिळवून देणार असल्याच्या भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष संजयकुमार कोळी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या .


मुस्लीमां विरोधात अपप्रचार करून धार्मीक तेढ वाढविणाऱ्या जात्यांध शक्ती विरोधात राष्ट्रवादीच्या सर्वच विभागांनी आवाज उठविणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी, आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादीच्या विरोधातच राष्ट्रवादीचे चार मेळावे घेणाऱ्या आणि जातीयवाद्यांच्या व्यासपीठावर जाणाऱ्या स्वपक्षीय नेत्यांना योग्य समज देणे गरजेचे आहे . तसेच सर्वच बाजूंनी उपेक्षित आटपाडी तालुक्याला विधानसभेची उमेदवारी मिळाली पाहीजे, वेळ पडल्यास विसापूर सर्कल मधून कोणालाही उमेदवारी दिल्यास किंवा माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा पाटील यांच्या बंधू भगिनी पैकी कोणालाही संधी दिल्यास आम्ही या निर्णयाचे स्वागतच करू . अशा भावना व्यक्त केल्या .


खानापूर आटपाडी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकसंघपणे काम करणे गरजेचे आहे . ओबीसी, एस . सी, एस . टी ., अल्पसंख्याक वगैरे समाज घटक राष्ट्रवादीचा जनाधार आहेत . या सर्वांना राष्ट्रवादी कडे आणण्यासाठी सर्वांनी ताकद लावू या . धर्मांध – जात्यांध शक्तीना सत्तेवरून पायउतार करण्यासाठी प्रयत्न करू या असे आवाहन खानापूर आटपाडी मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदरावबापु पाटील यांनी केले .


राष्ट्रीय नेते श्री . शरदचंद्रजी पवार साहेबांनी गेली ५ दशके सर्व धर्मातल्या शेकडो जाती – जमातींसाठी देश राज्य स्तरावर केलेल्या अभूतपूर्व कार्याला सामान्यांपर्यत पोहचविल्यास सर्व समाज घटक राष्ट्रवादी कडे पुन्हा जोडले जातील . महाराष्ट्रात सर्व प्रथम मंडल आयोग राबविण्यात पुढाकार घेणाऱ्या पवार साहेबांनी महिला आरक्षण, नामांतर, वगैरे शेकडो निर्णयाच्या माध्यमातून प्रचंड कार्य केले आहे .

हे कार्य राष्ट्रवादीची खरी ताकद आहे. असे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी, बालके, विद्यार्थी विद्यार्थीनींनी माता भगिनीं पासून वयोवृद्धां पर्यत प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश टाकणाऱ्या जयंत दारिद्रय निर्मूलन अभियान, या १८ वर्षापासून आमदार जयंतराव पाटील यांनी चालविलेल्या पॅटर्नने वाळवा तालुक्यातील ५० हजार लोकांना ५० कोटी रुपयांपेक्षा पेक्षा जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे . राज्यात हा पॅटर्न राबविल्यास तालुके, शहरे अशा ४०० विभागात प्रतिवर्षी २००० लोकांना लाभ देता आला तर एका पंचवार्षीक मध्ये ४० लाख लोकांना लाभ मिळणार असल्याने या सर्व परिवारात राष्ट्रवादी काँग्रेस मोठी सहानुभूती मिळवू शकतो .

राष्ट्रवादीचे महाराष्ट्रातील आजी – माजी संसद सदस्य, आजी – माजी विधीमंडळ सदस्य, पक्षाच्या विविध विभागाचे प्रदेश, जिल्हा, तालुका कार्यकारणीचे सदस्य यांच्या समन्वयातून हे अभियान राबवणे महत्वाचे आहे . या मोठ्या सामाजीक कार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोट्यावधी लोकांच्या मिळालेल्या सहानुभूतीने राज्यात स्वबळावर सत्तेवर येवू शकतो . हा जयंत पॅटर्न राष्ट्रवादीसाठी सत्तेची गुरुकिल्ली ठरू शकतो . असे मत व्यक्त केले .
कवठेमहांकाळच्या बी . एस . कोरे यांना आमदार करणाऱ्या आटपाडीकरांच्या आण्णासाहेब लेंगरे यांना लगेच आमदार करत कवठेमहंकाळ करांनी पैरा फेडला .

तथापि १२ वेळा आमदार झालेल्या खानापूर तालुका वाशियांनी फक्त एकदाच आटपाडीकराला आमदार केले आहे . या विसंगत अन्यायी पार्श्वभूमीवर येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत आटपाडी तालुका वाशियालाच राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली पाहीजे . असा पुनर्रुच्चार सादिक खाटीक यांनी केला .


प्रारंभी जालींदर कटरे यांनी स्वागत व प्रास्तावीक केले .यावेळी कवठेमहांकाळ राष्ट्रवादीचे दत्तात्रय दोडभिसे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दत्ता यमगर, समाधान भोसले, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, सोशल मिडीया तालुका अध्यक्ष किशोर गायकवाड, सामाजीक न्यायचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत, अंकुश मुढे, भारतआप्पा जवळे, खरसुंडीचे बाळासाहेब निचळ, अतुल जावीर, नितिन डांगे, धनाजी ठेंगले, शंकर पुकळे, विशाल जाधव, विश्वजित सरगर, शरद सोन्नुर, शंकर गळवे, बाळासाहेब अर्जून इत्यादी अनेक जण उपस्थित होते. शेवटी कामथचे माजी सरपंच परशुराम सरक यांनी आभार मानले

Views: 21
Share

Related Posts

लक्झरीचे चाक डोक्यावरून गेल्याने महाडिकवाडीतील युवकाचा मृत्यू
सांगली

लक्झरीचे चाक डोक्यावरून गेल्याने महाडिकवाडीतील युवकाचा मृत्यू

March 24, 2023
टेंभू योजनेच्या 6 व्या टप्प्यास 1 महिन्यात मंजुरी ….
सांगली

टेंभू योजनेच्या 6 व्या टप्प्यास 1 महिन्यात मंजुरी ….

March 24, 2023
प्रसाद के न्युज कडून पो.ना.नितीन लोखंडे व पो. कॉ. तुकाराम ढाले यांच्या साहसी कार्यासाठी सत्कार
सांगली

प्रसाद के न्युज कडून पो.ना.नितीन लोखंडे व पो. कॉ. तुकाराम ढाले यांच्या साहसी कार्यासाठी सत्कार

March 19, 2023
निरंकारी सद्गुरुंच्या दिव्य आगमनाचे औचित्य साधूनसांगलीमध्ये विशाल निरंकारी संत समागम संपन्नस्थिर परमात्म्याशी नाते जोडल्यानेच जीवनात स्थिरता येईलसद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
सांगली

निरंकारी सद्गुरुंच्या दिव्य आगमनाचे औचित्य साधून
सांगलीमध्ये विशाल निरंकारी संत समागम संपन्न
स्थिर परमात्म्याशी नाते जोडल्यानेच जीवनात स्थिरता येईल
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज

March 18, 2023
झरे ता.आटपाडी येथील महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
सांगली

झरे ता.आटपाडी येथील महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

March 18, 2023
निरंकारी सद्गुरूंचे सांगलीमध्ये दिव्य आगमन 17 मार्चलाविशाल निरंकारी संत समागमाचे आयोजनभक्तगणांमध्ये अद्भुत उत्साह आणि हर्षोल्हासाचे वातावरण
सांगली

निरंकारी सद्गुरूंचे सांगलीमध्ये दिव्य आगमन 17 मार्चला
विशाल निरंकारी संत समागमाचे आयोजन
भक्तगणांमध्ये अद्भुत उत्साह आणि हर्षोल्हासाचे वातावरण

March 16, 2023
Next Post
अखेर जिल्हा परिषद शाळा विभूतवाडीत पाचवीच्या वर्गास शिक्षण  मंत्रालयाची मंजुरी….. सरपंच – चंद्रकांत पावणे

अखेर जिल्हा परिषद शाळा विभूतवाडीत पाचवीच्या वर्गास शिक्षण मंत्रालयाची मंजुरी….. सरपंच - चंद्रकांत पावणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आ. जयकुमार गोरे जिंकले ; ग्रीन कॉरिडॉर एमआयडिसी म्हसवडलाच………विधानभवनातील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब ; माण – खटाव तालुक्यात जल्लोष
  • सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र
  • फुले एज्युकेशन तर्फे उच्चशिक्षित जाधव – माळी यांचा नाशिक मध्ये २६ मार्च रोजी होणार ३९ वा सत्यशोधक विवाह सोहळा .
  • सद्गुरु श्री श्री साखर कारखाना चेअरमन शेषागिरी राव अंकल यांनी अखंड बचेरीकरांचे मनं जिंकली…….सदगुरु श्री श्री साखर कारखान्याने पाणी टंचाईच्या झळा सोसणा-या दुष्काळी बचेरी गावचा सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ,,

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)