अखेर जिल्हा परिषद शाळा विभूतवाडी येथे पाचवीच्या वर्गाला शिक्षण मंत्रालयाची मंजुरी….. सरपंच – चंद्रकांत पावणे
आटपाडी प्रतिनिधी
विभूतवाडी ता. आटपाडी येथे जिल्हा परिषद शाळेला पाचवी चा वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. अशी माहिती सरपंच चंद्रकांत पावणे यांनी दिली.
शिक्षण मंत्रालयाने परवानगी दिल्यामुळे पाचवीचे वर्ग सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही. यापूर्वी पाचवीचा वर्ग सुरूच आहे परंतु पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी अनेक दिवसापासून प्रस्ताव प्रलंबित होता.
सरपंच चंद्रकांत पावणे, शिक्षण समिती व पालक यांच्या प्रयत्नाने अखेर शिक्षण विभागाने पाचवीचा वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
त्यामुळे पालक विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सध्या या पहिली ते चौथीपर्यंत चे वर्ग सुरू आहेत या शाळेचा मॉडेल स्कूलमध्ये समावेश आहे मॉडेल स्कूलमध्ये समाविष्ट असल्याने आणि पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या परवानगीमुळे दुधात साखर पडावी असंच काही झाले आहे.