दुष्काळी भागातील माण देशी धावली कोकणातील पूरग्रस्थांच्या मदतीला…
एक हजार कुटुंबाना जिवनावश्यक वस्तूंचे किट वाटप..
चिपळूण: चिपळूण मधील अतिवृष्टीचे संकट लवकरच टळेल या संकटामध्ये माण देशी फाउंडेशन तुमच्या सोबत राहिल असा दिलासा म्हसवड येथील माण देशी फौंडेशन च्या संस्थापिका श्रीमती चेतना सिन्हा यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिला.
श्रीमती सिन्हा पुढे म्हणाल्या की,माण देशी फाउंडेशच्या माण तालुक्यासह चिपळूण सिल्वासा,हुबळी इत्यादी ठिकाणी शाखा कार्यरत आहेत.
कोकणात विशेषत: चिपळूण भागात नुकताच अतिवृष्टीचा तडाखा बसुन पूरजन्य परिस्थिती उदभवल्यामुळे येथील माण देशी फाऊंडेशन तर्फे आपत्तीग्रस्त कोकणवासियांना तातडीची मदत देण्याचे सेवाभावी कार्य सुरु केले ज्याद्वारे महिला सक्षमीकरणाचे कार्य माण देशी फौंडेशन करत आहेत. चिपळूण मध्ये माणदेशी फौंडेशन ची शाखा २०१५-२०१६ साली सुरु झाली.आजपर्यंत चिपळूण मधील सुमारे ४० हजार मुली व महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे योगदान दिलेले आहे.
सध्या चिपळूण मध्ये पावसाची अतिवृष्टी झाल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. अशावेळी माण देशी फौंडेशनने चिपळूण मधील स्थानिक लोकांना मदत करण्यास सुरु केलेली आहे. प्रारंभी एकहजार गरजू कुटुंबांना तत्काळ मदतही पाठवण्यात आली आहे. यामध्ये तांदूळ,मीठ,खाद्य तेल,साखर, डाळ,चहा पावडर,साबण,हळद,जिरे, पोहे,बिस्कीट,मेणबत्ती, माचीस बॉक्स,मच्छर अगरबत्ती,मॅगी,मिल्क पावडर,सॅनिटरी नॅपकीन, टॉवेल,पाण्याची बॉटल, मास्क, पिण्याचे स्वच्छ पाणी साठवणूकी दिडहजार लिटर पाण्याचे कॅन्ड इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे कीट म्हसवड येथून पोहोचवण्यात आले आहेत.व त्याचे जलद गतीने वाटपही केले जात आहे.
चिपळूण येथील पुरग्रस्थाना “डाऊ केमिकल इंटरनॅशनल प्रायवेट लिमिटेड” यांचे सहकार्याने मदत लाभली असल्याची माहिती माण देशी फौंडेशनच्या मुख्य प्रशासन अधिकारी वनिता शिंदे यांनी दिली.
सौ शिंदे पुढे म्हणाल्या की,माण देशी फौंडेशन ही संस्था ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी १९९६ साली श्रीमती चेतना सिन्हा यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी भागात म्हणजे सातारा जिल्यातील म्हसवड या गावामध्ये सुरु केली. महिलांना त्यांच्या कुटुंबामध्ये व समाजामध्ये बरोबरीचे व सन्मानाचे स्थान मिळावे. त्यांना ज्ञान आणि कौशल्य देवून त्यांच्यातील निर्णय घेण्याची क्षमता वाढवावी यासाठी माणदेशी कार्यरत आहे. आतापर्यंत सुमारे सहा लाख ५० हजार महिलांनी माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारच्या व्यवसाय प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपले व्यवसाय सुरु केले आहेत व वाढविले आहेत.
सन २०२४ सालापर्यंत दहा लाख महिलांपर्यंत पोहीचण्याचा माणदेशीचा संकल्प आहे.
महिलांना त्यांची बचत सुरक्षित ठेवण्यासाठी व व्यवसायासाठी भांडवलाची गरज भागवता यावी यासाठी ग्रामीण महिलांसाठी १९९७ साली श्रीमती चेतना सिन्हा यांनी माण देशी बँक सुरू केली.
प्रामुख्याने महिलां उद्योजीकांच्या व्यवसायाला पाठबळ देण्याचे कार्य माण देशी फाऊंडेशन सोबत माण देशी महिलां बँक योगदान देत आहे.
महिलांसाठी फिरत्या भांडवलाची उभारणी करणे, महिला उद्योजिकांना त्यांच्या उत्पादनांच्या ऑनलाइन मार्केटिंग व विक्री करण्यासाठी माण देशी सहकार्य करत आहे. यासोबतच कोविड-१९ च्या काळात,रुग्णांसाठी रुग्णवाहिका,कोविड रुग्णांसाठी कोविड सेंटर ची उभारणी, कोविद covid patient साठी पौष्टिक जेवणाची मोफत सुविधासह कोरोना बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन मशीन पुरवठा करणे इत्यादी कार्य सुद्धा माण देशी सध्या करत आहेत.
याबरोबरच माण देशी फौंडेशनने पाचगणी येथील बेल-एअर हॉस्पिटल, सहकार्याने महिलांसाठी मोफत कोविड- १९ लसीकरणाचा उपक्रम राबवत आहेत या उपक्रमा अंतर्गत माण व खटाव तालुक्यासह इतर तालुक्यातील सुमारे नऊ हजार महिलांना मोफत लसीकरणाचा लाभ भेटलेला आहे व यापुढील काळातही मोफत लसीकरणाचा उपक्रम सुरु ठेवण्याचा माणदेशीचा मानस आहे.
याबरोबरच सिप्ला कंपनी च्या सहकार्याने महिलांना मास्क बनवण्याचे प्रशिक्षण देवून मास्क चे युनिट सुरु केले आहे.
म्हसवड येथे अल्पावधित माण तालुक्यातील महिलांसाठी मोफत सिटीस्कॅन ची सुविधा माण देशी फौंडेशन उपलब्ध करून देत आहेत. तसेच खोडोपाडी जाऊन महिलांना रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मल्टीविटॅमिन्स ची औषधे मोफत पुरवीत आहेत. यासोबतच कोव्हीड रुग्णांसाठी अद्यावत रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
माण देशी सर्व पातळ्यांवर कोविड-१९ च्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सौ.वनिता शिंदे यांनी सागितले.
यावेळी अपर्णा सावंत,ज्योती जाधव,वंदना भोसले,भाग्यश्री सुर्वे व माणदेशी फाउंडेशन चिपळूण शाखेतील सर्व सहकारी उपस्थित होते.