सामान्य शेतकरी कुटुंबातील महात्मा ज्योतिबा फुले आपल्या कार्याने महान बनलेःआ.जयकुमार गोरे
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गावी कटगूण ता. खटाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंतीनिमित्त आमदार जयकुमार गोरे यांनी उपस्थित राहून महात्मा फुले यांच्या स्मृतीला अभिवादन केले समानता आणि सत्यासाठी देह झिजवणारे, दलित उत्थान व महिला सबलीकरणासाठी सदैव समर्पित भारताच्या शैक्षणिक क्रांतीचे जनक, श्रेष्ठ समाजसुधारक, विचारवंत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीदिनी सादर नमन.
आमदार श्री.गोरे म्हणाले,महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोचवणे हे त्यांचे ध्येय होते मला अभिमान आहे ज्यांनी हा समाज घडविण्यासाठी महिलांना शिक्षण देण्यासाठी शेतकरी घडवण्यासाठी जुन्या चालीरीती सगळ्यांना मूठ माती देऊन नव्या समाजाची निर्मितीची बिजे ज्यांनी रोवली त्या महात्मा फुले यांचे गाव आपल्या कटगूण गावचे शेतकरी कुटुंबातील आपल्या कुळातीलच होते याचा मला सार्थ अभिमान आहे समाजाचे दगड धोंडे आपल्या अंगावर घेत या राष्ट्राला शिक्षणाचे महत्त्व सांगीतले अशा महापुरुषास मी अभिवादन करतो,
त्यावेळी उपस्थित अंकुश गोरे, महात्मा फुले सांस्कृतिक मंडळ अध्यक्ष काशिनाथ गोरे ,ट्रस्ट सचिव माजी सरपंच सुधीर गोरे, पोलीस पाटील जयश्री गोरे, उपसरपंच बाळासाहेब गायकवाड, आनंदराव राऊत, शशिकांत गोरे ,प्रताप गोरे ,अमर गायकवाड, प्रकाश गोरे,मेजर किरण गोरे,दत्तात्रय गोरे ,मा. ग्रा.सदस्य सोमनाथ गोरे ,हनुमंत गायकवाड,पोपट गोरे, शिवाजी गायकवाड, रमेश गायकवाड, अर्जुन गायकवाड व इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते