जय भवानी विद्यालयात विविध उपक्रमांसह महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
कै. आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जय भवानी विद्यालय पिंगळी बुद्रुक येथे आमच्या संस्थेचे कुशल मार्गदर्शक डॉक्टर आदरणीय संदीप जी पोळ (दादा) यांच्या मार्गदर्शनानुसार व जय भवानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. बनसोडे सर यांच्या सूचनेनुसार एक मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सौ निकम मॅडम यांच्यामार्फत करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बडवे सर यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण(डायट) संस्थेचे अधिव्याख्याता फलटण चे सन्माननीय कोकरे साहेब, जय भवानी, मुख्याध्यापक आदरणीय बनसोडे सर, विद्यालयाचे माजी विद्यार्थी अॅड. श्री संदीप जी सजगणे, दहिवडीचे प्रकाश घनवट,सौ. दडस मॅडम तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी वर्ग पालक वर्ग व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बनसोडे सर यांनी ध्वजारोहण केले.
इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी ध्वजगीत व महाराष्ट्र गीताचे गायन केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्वांच्या उपस्थितीत सरस्वती देवीचे व कै. स्वर्गीय सदाशिवरावजी पोळ (तात्या)व कै. स्वर्गीय बाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर नुकत्याच इयत्ता पाचवी स्कॉलरशिप इयत्ता आठवी स्कॉलरशिप चा निकाल लागला असून शाळेतील
१)कुमारी स्वरा बोराटे
२) कुमारी सुहानी दडस
३) कुमारी आर्या शेडगे
४)कुमारी श्रद्धा शेलार
५) यश कुंभार
विद्यार्थ्यी पात्र झाले असून इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणारी कुमारी यादव श्रावणी विश्वास ही सारथी स्कॉलरशिप धारक झाली आहे.
अटल भूजल योजनेअंतर्गत विद्यालयामध्ये 175 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून भरीव कामगिरी करून शाळेचा नावलौकिक वाढविला या योजने अंतर्गत वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रभात फेरी इत्यादी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वरील स्पर्धेतून इयत्ता पाचवी ते सातवी लहान गट इयत्ता आठवी ते नववी मोठा गट अशा दोन्ही गटातून प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ नंबर काढण्यात आले होते अशा ह्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुलाब पुष्प,मेडल व सर्टिफिकेट देऊन श्री.कोकरे साहेब, बनसोडे सर, अॅडवोकेट संदीप सजगणे, प्रकाश घनवट, हनुमंत बाबर, शंकर, सजगणे, विश्वास यादव, रेवनाथ जगदाळे , दिलीप जगदाळे प्रवीण जगदाळे, अण्णासो जगदाळे, राजेंद्र सत्रे, पिंटू गुजले ,किसन गुजले इत्यादी माता पिता पालक यांच्या उपस्थितीत व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्याच आई वडील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमानंतर तंबाखू मुक्तीची शपथ मान्यवरांच्या उपस्थित विद्यार्थ्यांसह घेण्यात आली. जय भवानी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व अॅड. श्री संदीप सजगणे यानी विद्यालयातील गरीब पण होतकरू एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले दत्त घेऊन समाजात एक वेगळाच आदर्श घालून दिला. दत्तक मुलांचा सर्व शैक्षणिक खर्च ते उचलणार आहेत याप्रसंगी त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.उपस्थितांना चहापाणी देऊन वर्गनिहाय माता-पिता पूजनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांची यथावत पूजन केले.
आई-वडिलांना नमस्कार करून त्यांचे औक्षण केले. माता पिता पूजनाचा कार्यक्रम विद्यालयात राबवून संस्कारक्षम पिढी घडवण्याचे काम जय भवानी विद्यालयात होत आहेत असे गौरव उद्गार पालक वर्गानी काढले सदर कार्यक्रम विद्यालयात राबविल्याबद्दल पिंगळी पंचक्रोशीत समाधान व्यक्त होत आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी श्री राजेंद्र जाधव व श्री कुलकर्णी सर तसेच सर्वच सहकार्यानी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. त्याबद्दल सांस्कृतिक विभागाच्या वतीने सर्वांचे आभार कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.