पंकज महाले यांचा नाभिक समाजाकडून सन्मान
त-हाडी
नंदुरबार जिल्हा क्राईम ब्रांच या पोलीस विभागात कार्यरत असलेले नाभिक समाज बांधव श्री पंकज महाले यांना माननीय पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पोलीस विभागाकडून देण्यात आले त्याबद्दल त्यांचा नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेकडून सत्कार करण्यात आला आज दिनांक 30 /4 /2023 रोजी वार रविवारी देव मोगरा माता मंदिराच्या परिसरात नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्थेची त्रैमासिक मीटिंग घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पंकज भदाणे हे होते राष्ट्रसंत संत संत सेना महाराज प्रतिमा पूजन करून सभेची सुरुवात झाली सभेमध्ये संस्थेमार्फत आगामी विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम घेण्यात येणार आहे त्या कार्यक्रमात वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धा या विविध गटात घेण्यात येणार असून त्यासाठी समाजबांधवांनी आपल्या पाल्यांची नावे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे 10 जून पर्यंत जमा करावयाची आहेत त्यानुसार सर्व स्पर्धा घेण्यात येतील व एक ते तीन क्रमांक प्राप्त उमेदवारांना प्रमाणपत्र ट्रॉफी बक्षीस देण्यात येईल
.नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हित वर्धक व कर्मचारी संस्था ही तळागाळातील समाज बांधवांसाठी काम करणारी एकमेव ऑडिट प्राप्त संस्था असून संस्थेचा कारभार पारदर्शक रीतीने चालतो या संस्थेत कोणताही समाज बांधव वार्षिक व आजीवन सभासद होऊ शकतो तसेच समाजासाठी सामाजिक उपक्रमासाठी योगदान देऊ शकतो त्या अनुषंगाने आपले चांगल्या रीतीने कामकाज सुरू असून सुरू आहे.
समाजातील जे समाज बांधव शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत त्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल जे बांधव 2022/ 23 या वर्षात सेवानिवृत्त झालेले असतील त्यांची त्यांनी आपली नावे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे द्यावयाचे आहेत. त्रिमासिक सभेमध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव प्राप्त केलेले श्री ज्ञानेश्वर सोनवणे यांचाही सत्कार संपूर्ण टीमच्या वतीने करण्यात आला नाभिक समाजासाठी एक एकर जागा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली त्यासाठी सर्व समाज बांधवांनी संस्थेकडे आपापल्या परीने अल्प मदत जमा केल्यास समाजासाठी लवकर जागा घेता येईल असे आवाहन संस्थेचे सचिव हिमांशू बोरसे यांनी केले
उपाध्यक्ष अरविंद निकम यांनी संस्थेचे आजीवन सभासद वाढवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. राष्ट्रसंत संत सेना महाराज निधी लिमिटेड या आपल्या हक्काच्या व्यासपीठाचा वापर सर्व समाज बांधवांनी करावयाचा आहे व आपला आर्थिक विकास करावा असे आवाहन मीनाक्षी भदाणे यांनी केले,खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली
आभार प्रदर्शन संस्थेचे जिल्हा संघटक विजय सैदाणे यांनी केले तरी त्रिमासिक सभेसाठी संस्थेचे अध्यक्ष पंकज भदाणे उपाध्यक्ष अरविंद निकम सचिव हिमांशु बोरसे, प्रसिद्धी प्रमुख प्रकाश देवरे,सहसचिव छगन भदाणे कोषाध्यक्ष शिवाजी मिस्त्री संघटक विजय सैदाणे संचालक शशिकला सोनवणे ,छगन सूर्यवंशी, प्रकाश सैदाणे ,नरेंद्र महाले ,मयूर सूर्यवंशी, सुधीर निकम ,रवींद्र सोनवणे, अनिल भदाने ,ज्ञानेश्वर सोनवणे सल्लागार ओंकार शिरसाट शेलंबा तालुका अध्यक्ष राजेश सूर्यवंशी,अनिता सूर्यवंशी, युवा मोर्चाचे अध्यक्ष समाधान सैंदाणे जयेश सोनवणे तळोदा तालुका अध्यक्ष विजय सैंदाने ,विष्णू सैंदाणे, दिलीप सूर्यवंशी, हेमंत बिरारे ,निळकंठ महाले, पंकज महाले इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.