करगणीत दिव्यांगाना जीवे मारण्याची धमकी
आटपाडी प्रतिनिधी
करगणी ता. आटपाडी येथील दिव्यांग सुनील दिलीप लांडगे व त्यांचा भाऊ यांना कल्पना यशवंत कांबळे, बाबू यशवंत कांबळे, कबीर यशवंत कांबळे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद पोलिसांमध्ये नोंद झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 6 /5/ 2023 रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास करगणी येथे फिर्यादी घरी असताना कल्पना यशवंत कांबळे, बाबू यशवंत कांबळे, कबीर यशवंत कांबळे सर्व राहणार करगणी यांनी संगणमत करून फिर्यादीच्या घरी येऊन गाडी भाड्याच्या कारणावरून आमचे तुम्ही घर जाळले असे म्हणून शिवीगाळ करून फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ उमेश आई हिला कशाला शिवीगाळ करत असता असे म्हणत असताना फिर्यादी व फिर्यादी चां भाऊ अंध असल्याचे माहित असताना देखील हे आंधळ्यानो समोर येऊन भांडण करा, मग तुम्हाला दाखवतो. तुम्हाला दिसत पण नाही तुम्ही आंधळे आहात. तुम्ही चाचपडत चालता तुम्हाला सांगोल्याचे गुंड आणून जिवे मारीन.
असे म्हणून शिवीगाळ केली फिर्यादी अपंग असून फिर्यादी व फिर्यादीचा भाऊ उमेश याला वारंवार हे आंधळ्यानो तुम्हाला दाखवतो असे म्हणून फिर्यादीचा अपमान करून अपंग असल्याचे हिणवून तेथून निघून गेले होते. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार नोंद केली असून पुढील तपास पोलीस हे.कॉन्स्टेबल गावडे करीत आहेत.