भारतीय जनता पार्टीमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या संघटन व मोर्चेबांधणी विषयी सातारा भाजपा व माणमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी आ.जयकुमार गोरे व जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संघटनात्मक चर्चा केली.
माणचे युवा नेते डॅा.संदिप पोळ यांना युवकांसाठी पक्षाच्या माध्यमातून लागेल ती मदत देण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्री.कदम व आ.गोरे यांच्या उपस्थितीत घेतलेल्या भेटीमुळे डॅा.पोळ यांना पक्षाची ताकद मिळणार यात शंका नाही.
आ.जयकुमार गोंरेंना नेतृत्व मानून हिवाळी अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे घड्याळ सोडत भाजपाचे कमळ हाती घेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती.याची चर्चा माण खटावमध्ये मोठ्या प्रमाणात झाली होती.
युवा पिढीसाठी एकत्रीकरण करून युवा फळी मजबूत करणे,शिवधर्म फाऊंडेशन मार्फत मतदारसंघात भाजपाला संघटन देणे,येत्या लोकसभा,जि.प,पं.स,नगरपरिषदे साठी युवकांचा सहभाग यासारख्या अनेक विषयांवर चर्चा झाली.तसेच शिवधर्म फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष रविकिरण पोळ,चंद्रकांत पोळ,प्रभाकर पोळ,जयदत्त देवकाते,योगेश पोळ,अमर सावंत यांनी भाजपात प्रवेश केला.डॅा.पोळ यांच्यासह मार्डीतील सर्व कार्यकर्त्यांनी भाजपा व आ.गोरे ‘बांधतील ते तोरण,ठरवतील ते धोरण’अशापध्दतीने वाटचाल करत राहू असे सर्वांनी सांगितले.
यावेळी आ.जयकुमार गोरे,जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम,युवानेते मनोज घोरपडे उपस्थित होते.