विभूतवाडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजप व सर्व पक्षीय आघाडीत टशन
भाजप सत्ता अबाधित राखणार का ? सर्व पक्षीय आघाडी सत्ता काबीज करणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष
आटपाडी प्रतिनिधी
विभुतवाडी ता. आटपाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सुरू असून भाजप व आघाडी मध्ये दोन्ही गटामध्ये टशन आहे.
भाजपाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेना व इतर सम वैचारिक कार्यकर्त्यांनी मिळून आघाडीची स्थापना केली आहे.
यामध्ये भाजपकडून हनुमान ग्रामविकास पॅनेल स्थापन करून सरपंच पदासाठी चंद्रकांत राजाराम पावणे उभा आहेत. तर सर्व पक्षीय जय हनुमान ग्राम विकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून सुरज तानाजी पाटील हे सरपंच पदासाठी उभा राहिले आहेत.
तर सरपंच पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून तानाजी खर्जे उभा राहिले आहेत.
श्री हनुमान ग्रामविकास पॅनेल मधून वार्ड क्रमांक एक मधून पवार पांडुरंग बाबुराव ,खर्जे सुवर्णा संजय, गोयकर आकाताई आबाजी हे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
तर वार्ड क्रमांक दोन मधून खर्जे मोहन लक्ष्मण, अनुसे विजय दशरथ व कांबळे सारिका हरिदास या निवडणूक लढवीत आहेत. तर वार्ड क्रमांक तीन मधून पडळकर नाना विठ्ठल, खर्जे जयश्री रमेश व मोटे रजाक्का बाळू या उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
तर जय हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनल मधून वार्ड क्रमांक एक मधून तरसे मच्छिंद्र नामदेव, पावणे स्नेहल जालिंदर, मोटे रंजना तुकाराम या निवडणूक लढवीत आहेत ,तर वार्ड क्रमांक दोन मधून मोटे विलास रामचंद्र ,खताळ खाशाबा पांडुरंग ,सकट सीमा राहुल हे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.
तर वार्ड क्रमांक तीन मधून थोरात अधिकराव राजाराम, खर्जे रंजना कृष्णा व पाटील वंदना शिवाजी या निवडणूक लढवीत आहेत.
मागील निवडणुकीमध्ये कैलासवासी तानाजीराव रामचंद्र पाटील व चंद्रकांत राजाराम पावणे हे थेट सरपंच पदासाठी निवडणूक लढवत होते. त्यामध्ये कैलासवासी तानाजीराव पाटील यांचा पराभव झाला होता.
तर चंद्रकांत पावणे यांची ही तिसरी निवडणूक आहे. यापूर्वी ते सदस्य म्हणून निवडून आले होते त्यानंतर मागील टर्ममध्ये सरपंच पदासाठी ते निवडून आले होते व आत्ता तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा आहेत.
तर मागील पाच वर्षांमध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत ती सर्व कामे मतदाराच्या समोर आहेत तर कोणतीही सत्ता नसताना सुरज पाटील यांनीही विकास कामे केली आहेत. तेही मतदाराच्या नजरेसमोर आहेत आता मतदार राजा नक्की कोणाला निवडून आणायचे ते ठरवेल.
वैशिष्ट्य म्हणजे चंद्रकांत पावणे यांनी उमेदवार उभा करीत असताना दोन उमेदवार आयात केले आहेत.वार्ड क्रमांक दोन व वार्ड क्रमांक तीन मध्ये उमेदवार आयात केले आहेत. याचा फटका त्यांच्या पॅनल बसतोय की काय हे मतदार ठरवतील कारण दोन्ही उमेदवारांना स्वतःचे मत स्वतःला देता येत नाही. त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू आहे तर त्यांच्या पॅनलला प्लस पॉईंट म्हणजे गावामध्ये केलेली विकास कामे होय.
तर दुसऱ्या बाजूला विचार केला असता सुरज पाटील हे वडिलांच्या निधनानंतर कंट्रक्शन मध्ये काम करत होते .त्याचबरोबर समाजकार्य ही करत होते कोणतीही सत्ता नसताना छोटी-मोठी अनेक कामे त्यांनी केली आहेत त्यामुळे मतदार राजा नक्की कोणाला कौल देतो हे निकालानंतरच समजेल. तर वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरले आहेत.
सध्याच्या वातावरणानुसार दोन्हीही गटातील कोणीही निवडून येण्याची गॅरंटी देऊ शकत नाहीत .कारण शेवटी मतदार हा राजा आहे आणि मतदार राजा ठरवल तेच उमेदवार निवडून येतील.
परंतु दोन्ही गटामध्ये म्हणजेच भाजप शिवसेना मित्र पक्ष गटामध्ये उमेदवारांना उत्सुकता आहे त्यामुळे प्रचारांमध्ये सुद्धा टशन झालेली पाहायला मिळत आहे. शेवटी मतदार राजा कोणत्या गटाला कौल देतो हे निकाला दिवशी समजेल.







